Mahhi Vij: माहीच्या लेकीला नमाज अदा करतांना पाहून नेटकरी संतापले! तिनंही दिलं सडेतोड उत्तर..

Jay Bhanushali's Daughter Tara Is Brutally Trolled For Reading Namaz  Mahhi Gives A Befitting Reply
Jay Bhanushali's Daughter Tara Is Brutally Trolled For Reading Namaz Mahhi Gives A Befitting ReplyEsakal

टीव्हीवरील लोकप्रिय जोडपे माही विज आणि जय भानुशाली हे नेहमी लाइमलाईटमध्ये राहतात. त्यांच्याबरोबरच त्यांची मुलगी मुलगी तारा (माही देखील प्रसिद्धीच्या झोतात राहते. दोघेही मुलीमुळे चर्चेत राहतात. माही छोट्या पडद्यापासून दुर असली तरी ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते.

माहीने तिची मुलगी ताराच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला. जो थोड्या वेळातच व्हायरल झाला. यामध्ये तारा ही नमाज पठण करतांना दिसत होती. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काही लोकांनी ताराला खुप ट्रोल केलं. लोकांनी तिला खुपच वाईट कमेंट केल्या.

Jay Bhanushali's Daughter Tara Is Brutally Trolled For Reading Namaz  Mahhi Gives A Befitting Reply
TMKOC Jethalal : 'लाज कशी वाटत नाही हो म्हणायला'! जेठालालच्या पप्पांवर नेटकरी का चिडले?

या पोस्टला आलेल्या नकारात्मक कमेंटला आता अभिनेत्री माही विजने देखील चांगलाच उत्तर दिलं आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांचा जोरदार क्लास घेतला.

त्यानंतर माहीने तिच्या मुलीचा आणखी एक व्हिडिओ शेयर केला आणि लिहिलं की, 'हे त्या मुर्ख लोकांसाठी आहे ज्यांनी धर्माची चेष्टा केली आहे. तुम्ही ताराला अनफॉलो करू शकता. तिला असंही द्वेष करणारे लोक नको आहेत.'

Jay Bhanushali's Daughter Tara Is Brutally Trolled For Reading Namaz  Mahhi Gives A Befitting Reply
Super Dancer -Chapter 3: लहान मुलाला शोमध्ये विचारला अश्लील प्रश्न! NCPCR ने केली कारवाई

पुढे ती लिहिते, 'मी स्वतः एक आई असल्यानं मला माहित आहे की मी तिला काय शिकवत आहे. मनाने लहान असणाऱ्या लोकांना शुभेच्छा. इतका द्वेष पाहून वाईट वाटले. माझ्या मुलीची काळजी करू नका, तुमच्या मुलांना शिकवा.या व्हिडिओत माही आणि तारा एका मंदिरात प्रार्थना करताना दिसत आहे.'

Jay Bhanushali's Daughter Tara Is Brutally Trolled For Reading Namaz  Mahhi Gives A Befitting Reply
Pankhuri-Gautam Blessed With Twins: गौतम-पंखुरीची गोड बातमी! जुळ्या बाळाचं स्वागत

आता माहीचा हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे तर अनेकांनी तिच्यावर पुन्हा टिका केली आहे.

काही दिवसांपुर्वीही माही आणि तारा एका कार्यक्रमात दिसले होते. यावेळीही 4 वर्षांच्या ताराच्या चेहऱ्यावर लिपस्टिक आणि आय लाइनर लावल्याने नेटकऱ्यांनी माहीला ट्रोल केलं होते.त्यावेळीही माहीनं लोकांना सुनावलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com