
VIDEO: रस्त्यावर प्रसिद्ध अभिनेत्री माहीची छेड, बलात्काराची दिली धमकी
Tv Actress: सोशल मीडीयावर (Social media News) नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अदांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून माही विजचं (Mahi Vij) नाव घ्यावं लागेल. तिचा सोशल मीडियावर फॉलोअर्सही मोठा आहे. आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत (Entertainment News) आली आहे. एकानं तिची भर रस्त्यात छेड काढून तिला बलात्काराची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे भडकलेल्या माहीनं त्या (Bollywood News) अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. माहीनं सोशल मीडियावर पोस्ट शेय़र करुन यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. तिचं ट्विट वाचल्यावर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. तिनं यासंबंधी एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या वाहनाचा क्रमांक दिसून येत आहे.
बिग बॉसच्या 16 व्या पर्वामध्ये माही विजनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्या बोल्डनेसनं चाहत्यांना चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून माही परिचित आहे. बिग बॉसमध्येही तिनं आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना खुश केले होते. मात्र तिचा प्रवास त्या रियॅलिटी शो मधून लवकर संपला होता. तरीही तिनं आपल्या वेगळ्या अदकारीनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. माहीनं सोशल मीडियावर ट्विट करुन एक व्हिडिओ व्हायरल केला आहे.त्यामध्ये एका व्यक्तीनं तिची छेड काढून तो पळताना दिसत आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या वाहनाचा क्रमांकही दिसत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई पोलिसांनी या व्हिडिओची नोंद घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
तो व्हिडिओ शेयर करताना माहीनं लिहिलं आहे की, त्या व्यक्तीनं माझ्या वाहनाला टक्कर दिली आहे. त्यानंतर त्यानं मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. माझ्याशी गैरवर्तन केले. आणि बलात्काराची धमकी दिली. त्यामुळे मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ कारवाई करण्याची विनंती करते. माहीच्या त्या व्टिटनंतर मुंबई पोलिसांनी त्याला उत्तर दिले आहे. तिला जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायला सांगितली असून त्याची दखल घेतली जाईल असे उत्तर दिले आहे.