
Jaya Bachchan video viral: महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन यांना सतत एवढा कसला राग येतो असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. काहीही झालं की, त्या चाहत्यांवर चिडचिड करताना दिसून आले आहे. आताही एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट फोटोग्राफर्सवर निशाणा साधला आहे. त्या फोटोग्राफर्सच्या मागे जाण्यापर्यत त्यांचा राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांचा नवरात्रीमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. फोटो काढताना लाज कशी वाटत नाही, अशा शब्दांत जया बच्चन यांना राग आला होता. त्यावर नेटकऱ्यांनी देखील एवढा राग येतो तर घराबाहेर पडताच कशाला असा प्रश्न थेट जया बच्चन यांना केला होता. वास्तविक त्या कार्यक्रमामध्ये त्याचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता.
अभिषेक चाहत्यांना मनसोक्तपणे फोटो घेऊ देत होता. जया बच्चन यावेळी चिडलेल्या दिसल्या. त्यांचा संताप अनावर झाला होता. आताही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये जया बच्चन यांचा राग दिसून येईल. ऐन दिवाळीच्या निमित्तानं फोटो काढण्यासाठी आलेल्या पापाराझ्झींना जया बच्चन यांच्या रागाला सामोरं जावं लागलं आहे. त्या कॅमेरामॅनवर जया बच्चन चांगल्याच भडकल्याचे दिसून आले आहे. बच्चन परिवाराची दिवाळी ही नेहमीच स्पेशल असते. त्यावेळचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्स गर्दी करत असतात.
जया बच्चन यांना मात्र फोटोग्राफर्सनं गर्दी करणं काही आवडलेलं नाही. त्यांनी त्या कॅमेरामॅनवर राग व्यक्त केला. चाहत्यांनी देखील जया बच्चन यांच्या रागावर नाराजी व्यक्त केली आहे. दरवेळी सोशल मीडियावर एवढा राग व्यक्त करणं चांगल नाही. अशा प्रतिक्रिया त्यांनी बच्चन यांना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.