Jaya Bachchan: 'चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला मासिक पाळी आली अन्...',जया बच्चन यांचा विचित्र अनुभव Menstrual Ordeals | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaya Bachchan Opens Up About Her Menstrual Ordeals Back In The Day

Jaya Bachchan: 'चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला मासिक पाळी आली अन्...',जया बच्चन यांचा विचित्र अनुभव

Jaya Bachchan on Menstrual Ordeals: मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे आणि पाळी येणे प्रत्येक स्त्रिच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. जया बच्चन यांनी मासिक पाळीवर नुकताच खुलासा करताना आपल्याला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा काय घडले होते हे सांगितले आहे. (Jaya Bachchan Opens Up About Her Menstrual Ordeals Back In The Day)

हेही वाचा: Mithun Chakraborty: 'माझ्यावर बायोपीक बनवू नका, माझी कहाणी कोणालाही...', हे काय बोलून गेले मिथून दा?

जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्त शैलीसाठी ओळखल्या जातात. नुकतंच जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली हिच्याशी लग्नाशिवाय मूल होण्याविषयी मोठं भाष्य केलं होतं. त्यावरनं त्यांना खूप ट्रोल केलं गेलं होतं. तर आता जया बच्चान या नात नव्या नवेली नंदा हिच्याशी त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल स्पष्ट बोलल्या आहेत.

हेही वाचा: Childrens Day: 'मॅडम,तुम्ही लहानपणीही किती...',बालदिनी मानसी नाईकचा फोटो अन् चाहत्याची कमेंट चर्चेत

जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदासोबत तिच्या 'व्हॉट द हेल' या नव्या पॉडकास्टमध्ये मासिक पाळी विषयी चर्चा केली. नव्यानं तिच्या पॉडकास्टमध्ये आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांच्यासोबत त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रंजक प्रश्न विचारले. आता नव्याच्या नवीन पॉडकास्टचा विषय होता पीरियड्स. नव्याने तिच्या आजी आणि आईला त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल प्रश्न विचारले.

हेही वाचा: Childrens Day 2022: उर्फीच्या बालपणीच्या फोटोचीही होऊ लागली चर्चा; लोक म्हणू लागलेयत...

श्वेता बच्चनने देखील तिची मुलगी नव्याच्या पॉडकास्ट शोमध्ये तिच्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल खुलेपणाने सांगितले. श्वेताने सांगितले की,''त्यावेळी मला फक्त बेडवर झोपावे, चॉकलेट, कार्ब्स खावे आणि एकटे राहावे असे वाटते. मन खूप चिडचिड होते. फक्त एकटे राहणे आवडते''.

यासोबतच नव्याची आजी जया बच्चन यांनीही तिच्या मासिक पाळीच्या अनुभवाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. मासिक पाळीविषयी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, ''चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना मासिक पाळी आली होती. शूटिंगवर जावं लागलं आणि त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन नव्हती. त्यामुळे काहीवेळा पॅड बसमध्ये किंवा झुडपांच्या मागे बदली करावा लागायचा. आता यावर खुली चर्चा होते आणि सगळ्यांना उघडपणे माहिती आहे पण पूर्वी त्यावेळी अशी चर्चा होत नव्हती त्यावेळी खूप विचित्र परिस्थिती असायची. आम्हाला खूप लाज वाटायची''.