esakal | चालु कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याला बोलल्या होत्या असं काही की ऍशला लगेचच आलेलं रडू.. 
sakal

बोलून बातमी शोधा

jaya

ऐश्वर्या आणि जया यांचं नातं कसं आहे हे क्वचितंच कोणाला माहित असेल आणि म्हणूनंच सध्या हा दोघींशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय..

चालु कार्यक्रमात जया बच्चन ऐश्वर्याला बोलल्या होत्या असं काही की ऍशला लगेचच आलेलं रडू.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटी घरातंच अडकलेले आहेत तर काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबापासून लांब आहेत..सगळ्यांनाच त्यांच्या जवळच्या व्यक्तींची आठवण या लॉकडाऊनमध्ये प्रकर्षाने जाणवतेय..अशांतच एक सेलिब्रिटी सासू-सुनेची चर्चेत असणारी प्रसिद्ध जोडी म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन.. ऐश्वर्या सध्या कुटूंबासोबत मुंबईतील घरी आहे तर जया कामानिमित्त बाहेर गेल्याने लखनऊमध्ये अडकल्या आहेत..ऐश्वर्या आणि जया यांचं नातं कसं आहे हे क्वचितंच कोणाला माहित असेल आणि म्हणूनंच सध्या हा दोघींशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय..

हे ही वाचा: सचिन आणि श्रिया पिळगांवकर या बापलेकीची ही जुगलबंदी पाहिली का?  

बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासोबतंच कौटुंबिक मुल्य जोपासणारी अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते..सोशल मिडीयावर सध्या ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसताेय..या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि तिची सासू जया बच्चनमधील नात्याचं बाॅन्डिंग पाहायला मिळतंय..

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जया बच्चन या स्टेजवर सगळ्यांसमोर पुरस्कार स्विकारत आहेत..आणि हा पुरस्कार स्विकारताना त्या सून ऐश्वर्या हिची सगळ्यांसमोर स्तुती करत आहेत..तसंच प्रेक्षकांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र बसलेले दिसत असून जया यांनी केलेली ही स्तुती ऐकून ऐश्वर्याचे डोळे पाणावतात..या व्हिडिओमध्ये जयाने ऐश्वर्यामध्ये असलेले गुण आणि तिचं हास्य याची स्तुती केली आहे..

ऐश्वर्या आणि जया या सासू-सुनेची जोडी बॉलीवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेली जोडी आहे..चाहते या सासू-सुनेच्या जोडीला चांगलंच पसंत करतात..ऐश्वर्या जया यांच्या अत्यंत जवळची आहे..सोशल मिडीयावर  संपूर्ण कुटूंबासोबत ऐश्वर्या नेहमीच फोटो शेअर करत असते..

jaya bachchan praises daughter in law aishwarya rai makes former miss world proudly emotional