Jaya Bachchan:लग्न न करता तुला मूल झालं तरी चालेल.. जया बच्चन यांचा नातीला अजब सल्ला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaya Bachchan says she has no problem if Navya has child without marriage, calls 'physical attraction' important

Jaya Bachchan:लग्न न करता तुला मूल झालं तरी चालेल.. जया बच्चन यांचा नातीला अजब सल्ला!

Jaya Bachchan: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकांना माहिती आहे. राज्यसभेत देखील त्यांच्या शीघ्रकोपीपणाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी बोलायला आणि फोटो घेण्यासाठी तर कुणी जात नसल्याचे दिसून आले आहे. जया बच्चन जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातात त्यावेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मात्र ही गोष्ट जया बच्चन यांना आवडत नाही. त्यावरुन कायमच त्यांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. आज मात्र त्या त्यांच्या रागामुळे नाही तर त्यांच्या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत.

(Jaya Bachchan says she has no problem if Navya has child without marriage, calls 'physical attraction' important)

जया यांनी त्यांच्या मुलीसह, श्वेता बच्चन नंदासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. विशेष म्हणजे हे चॅनल त्यांची नात नव्या नवेली नंदाने सुरु केले आहे. पॉडकास्टच्या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. या भागामध्ये जयाजींनी वेगवेगळ्या विषयांवर मत मांडले. याच वेळी त्यांनी ही विधान केले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: घरात फाटाफूट! अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा..

त्या म्हणाल्या, 'एखाद्या नात्यामध्ये प्रेमाबरोबर शारीरिक आकर्षण आणि अनुकूलता असणं आवश्यक असतं असं मला वाटतं. हे वक्तव्य काहींना आक्षेपार्ह वाटू शकते पण आत्ताची पिढी पार्टनरसह त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रयोग करत आहेत. आमच्या काळामध्ये असं करण्याची मुभा नव्हती. नातं टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची असते. त्याशिवाय त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. फक्त प्रेम, मोकळीक आणि समजूतदारपणा दाखवून नातं टिकणं अवघड असतं.”

हेही वाचा: Uunchai movie: अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी करतायत झुंबा, हे आहे कारण..

यावेळी त्या नव्याला संबोधून म्हणाल्या, 'मी याकडे वैद्यकीयदृष्ट्या पाहते. सध्या सर्वत्र भावनाशून्य लोक पाहायला मिळतात. माझ्या मते, तु तुझ्या बेस्ट फ्रेन्डशी लग्न करायला हवंस. जी व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला तू ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असं म्हणू शकतेस . पण याउलट आपल्याकडे मला तू आवडतोस म्हणून लग्न करुया असे शिकवले जाते. लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे.”

जया बच्चन पुढे म्हणाल्या, 'हा अनुभव आम्ही घेऊ शकलो नाही याची कधी कधी खंत वाटते. आमच्यानंतर श्वेताच्या पिढीतल्यांनाही आपल्या नात्यामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली नाही. पण आता तुझ्या पिढीमधले तरुण हे करु शकतात पण त्यांच्या मनामध्ये हा अनुभव घेताना दोषी असल्याची भावना येते, जे खूप चुकीचं आहे.' असे महत्वाचे विधान त्यांनी केले.