Uunchai movie: अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी करतायत झुंबा, हे आहे कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uunchai song Arre Oh Uncle: Amitabh Bachchan, Anupam Kher, Boman Irani do zumba to prepare for Everest climb

Uunchai movie: अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी करतायत झुंबा, हे आहे कारण..

वय कितीही झाले तरी आपल्या मध्ये नेहमी जोश असला पाहिजे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या पाहिजेतच आणि मैत्रीचा खरा अर्थ काय "उंचाई" या चित्रपटात दिसणार आहे. उंचाई चित्रपटातील 'हे ओ अंकल' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी सज्ज होण्यासाठी जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन ८० वर्षांचे आहेत. तर अनुपम खेर ६७ वर्षांचे आहेत आणि बोमन इराणी ६२ वर्षांचे आहेत. आता हे तिघेही नवीन गाणे घेऊन एकत्र आले आहेत.

(Uunchai song Arre Oh Uncle: Amitabh Bachchan, Anupam Kher, Boman Irani do zumba to prepare for Everest climb)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: घरात फाटाफूट! अमृता धोंगडे आणि तेजूच्या मैत्रीत दुरावा..

हे तिघे आगामी 'उंचाई' या चित्रपटातील रिलीज झालेल्या 'हे ओ अंकल' गाण्यात नाचताना दिसत आहेत. त्याचे कारण असे की, हे तिघेही माउंट एव्हरेस्टवर चढण्यासाठी जिममध्ये मेहनत करताना दिसत आहेत. या सगळ्याचं नेतृत्व अमिताभ बच्चन करत आहेत. बोमन इराणी आणि अनुपम खेर यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रयत्न करणार आहेत. ते जिममध्ये जॉगिंग करत आहे, वर्कआउट करत आहे, झुंबा डान्स करत आहे आणि बर्फाच्छादित डोंगरावर ट्रेकिंग करत आहे.

हेही वाचा: Amruta Subhash:आलिया नंतर आता अमृता सुभाषच्या प्रेग्नंसीची चर्चा! ४३व्या वर्षी होणार आई?

हे गाणे दिव्या कुमार आणि देवेंद्रपाल सिंग यांनी गायले आहे. त्याचबरोबर या गाण्याला अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, 'सर्व वयोगटातील लोकांसाठी, हे धमाकेदार गाणे आहे ऐका आणि पहा आणि तुम्ही पण आनंद घ्या. ज्यामध्ये आमचा स्वॅग आणि स्टाइलही आहे.

उंचाई या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा चार मित्रांची आहे जे वृद्धापकाळात एव्हरेस्टवर चढायला जातात. या चित्रपटात डॅनी डेन्झोंगपा देखील आहे, जो माउंट एव्हरेस्ट चढण्याची आकांक्षा बाळगतो पण त्याचा मृत्यू होतो. यानंतर, तिघे मित्र मिळून ठरवतात की ते आपल्या मित्राच्या अस्थी माउंट एव्हरेस्टवर विसर्जित करतील.