esakal | जया बच्चन यांच्या वाढदिवशी भावुक झाले अभिषेक-श्वेता..लॉकडाऊनमुळे जया दिल्लीत तर कुटुंब मुंबईत..
sakal

बोलून बातमी शोधा

jaya

मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या खास दिवशीही त्यांच्यापासून दूर असल्याने भावूक अंदाजात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..

जया बच्चन यांच्या वाढदिवशी भावुक झाले अभिषेक-श्वेता..लॉकडाऊनमुळे जया दिल्लीत तर कुटुंब मुंबईत..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत..देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जया बच्चन अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये अडकलेल्या आहेत तर त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत आहे..अशातच मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या खास दिवशीही त्यांच्यापासून दूर असल्याने भावूक अंदाजात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..

हे ही वाचा: सलमानचा 'राधे' ईदला प्रदर्शित होणार नाही.

जया यांचा मुलगा अभिषेकने सोशल मिडियावर त्यांचा एक फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत..तर मुलगी श्वेताने त्यांचा एक जुना फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..या दोन्ही पोस्ट पाहून हे दोघंही त्यांच्या आईपासून दूर असल्याने किती अस्वस्थ आहेत हे कळून येतंय..अभिषेकने लिहिलंय, 'प्रत्येक मुल तुम्हाला हेच सांगेल की त्याचा आवडता शब्द हा आई आहे. हॅपी बर्थडे आई.' खरं तर तु दिल्लीमध्ये आहेस, लॉकडाऊन सुरू आहे आणि आम्ही सगळे मुंबईत आहेत.' पण तुला तर माहीत आहे की तू आमच्या हृदयात आहेस.तुझ्याबद्दलच सतत बोलत असतो..मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आई.'

तर दुसरीकडे जया यांची मुलगी श्वेताने आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत लिहिलंय, 'मी माझ्यासोबत तुझंच हृदय घेऊन जगत असते, मी तुझ्याशिवाय काहीच नाही आहे, (मी जिथे जाते तिथे तू माझ्या सोबतच असते) हॅप्पी बर्थडे आई..मी तुझ्यावर खूप प्रेम करते.' 

जया बच्चन तिच्या काळात एक उत्तम अभिनेत्री होती जी तिच्या अभिनयामुळे त्यावेळच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत होती...त्यानंतर अमिताभ यांच्यासोबत लग्न झाल्यावर त्यांनी त्यांच्या करिअमध्ये ब्रेक घेतला..मात्र नंतर 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' मध्ये आईची भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली..

On jaya bachchans birthday adorable wishes from abhishek and shweta

loading image