esakal | अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ, जया साहाने एनसीबीसमोर दिली कबुली 

बोलून बातमी शोधा

jaya saha shraddha kapoor}

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात जया साहाने अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात जया साहाने कबुल केलं आहे की तिने अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी सीबीडी ऑईल खरेदी केलं होतं.

manoranjan
अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ, जया साहाने एनसीबीसमोर दिली कबुली 
sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत ड्रग केसमध्ये ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासात जया साहाने अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात जया साहाने कबुल केलं आहे की तिने अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी सीबीडी ऑईल खरेदी केलं होतं. जयाने चौकशीमध्ये आणखी अनेक नावांचा खुलासा केला असल्याचं कळतंय. याआधी देखील जयाच्या केलेल्या चौकशीमध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदूकोण सारख्या सेलिब्रिटींची नावं पुढे आली असल्याचं म्हटलं जातंय.

हे ही वाचा: पूनम पांडेने लग्नाच्या १२ दिवसांनंतर पती सॅम बॉम्बेविरोधात केली मारहाण आणि विनयभंगाची तक्रार, पोलिसांनी केली अटक  

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी झालेल्या चौकशीत एनसीबीने जया साहाला तिच्या व्हॉट्सअप चॅटबाबत विचारणा केली. या चौकशीत जया साहाने कबुल केलं की तिने श्रद्धा कपूर व्यतिरिक्त सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, निर्माते मधु मांटेना आणि स्वतःसाठी सीबीडी ऑईलची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. जयाने हे देखील सांगितलं की यासाठी तिने कोणत्याच ड्रग पेडलरशी संपर्क केला नव्हता. जया साहाचं रिया चक्रवर्तीसोबतचं व्हॉट्सअप चॅट समोर आलं होतं ज्यामध्ये त्या खुलेआम ड्रगविषयी बातचीत करत होत्या. यानंतरच जयाला एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं.

जया साहा टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानची कर्मचारी आहे जी सुशांतसोबतंच अनेक मोठ्या स्टार्सचं काम पाहते. मंगळवारी क्वानचे सीईओ ध्रुव यांना देखील चौकशीसाठी बोलवलं होतं. क्वानमध्ये मधु मांटेना यांचा देखील मोठा हिस्सा आहे. 'क्वीन' आणि 'सुपर ३०' सिनेमाचे निर्माते मधु मांटेना आणि जया साहा यांची आज समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते.   

jaya saha admits that she procured cbd oil for shraddha kapoor drug chat case ncb probe