मलेरिया दादुस आयला रं... टाईमपास ३ मध्ये झळकला पनवेलचा जयेश चव्हाण

'टाईमपास मध्ये मी 'मलेरिया' नावाची आगरी तरूणाची भूमिका साकारली होती.
jayesh chandrakant chavan in hruta durgule shooting timepass 3
jayesh chandrakant chavan in hruta durgule shooting timepass 3sakal

पाली : 'दगरूचा बिपी वाढवायला मलेरिया दादूस आयला रं...' असं म्हणत रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास ३' या चित्रपटाचा धम्माल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'टाईमपास'च्या पहिल्या भागाप्रमाणे तिस-या भागातही अभिनेता जयेश चव्हाण 'मलेरिया'च्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या 'गोर गोर आगरी बोलीत' प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी तो सज्ज झाला आहे. जयेश रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी आहे.

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल जयेशने सकाळला सांगितले, 'टाईमपास मध्ये मी 'मलेरिया' नावाची आगरी तरूणाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे मला नवी ओळख मिळाली. पुन्हा ही गाजलेली भूमिका साकारायला मिळतेय हे माझे भाग्यच आहे. पुढे तो म्हणाला, मी कोकणी असूनही लोक मला आगरी समजतात, जिथे जातो तिथे प्रेमाने दादूस बोलतात. माझ्यासाठी ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. आगरी समाज आणि त्यांच्या भाषेचा खूप आदर आहे. आगरी भाषा शिकण्यासाठी आगरी युवा साहित्यिक सर्वेश तरे यांची मोलाची मदत झाली असेही जयेश म्हणाला.

पहिल्या भागात झळकलेली दगडूच्या मित्रांची गँग पुन्हा आठ वर्षांनी तिसऱ्या भागात दिसणार आहे. त्यामुळे दगडु आणि पालवी यांच्या लव्ह स्टोरीसोबत मित्रांची कॉलेजातील धम्माल यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. 'पुन्हा जून्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आम्ही खूप उत्साहित होतो. रिल लाईफप्रमाणे रियल लाईफमध्ये देखील आमची मैत्री घट्ट झाली आहे. याचाच प्रत्यय तुम्हाला चित्रपट पाहताना येईल,' असे जयेश सांगतो. भूमिकेसाठी जयेशने आठ किलो वजन घटवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तिरेखेमधील निरागसता जपणे हे माझ्यासाठी खूप मोठे चॅलेंज होते. दिग्दर्शक रवी जाधव आणि लेखक प्रियदर्शन जाधव यांच्यामुळे हे पात्र साकारणे सोपे झाल्याचे त्याने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com