शाहिदच्या 'जर्सी' वर चोरीचा आरोप; निर्मात्यांविरोधात लेखकाची कोर्टात धाव Shahid Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'Jersey' actors-Shahid Kapoor & Mrunal Thakur

शाहिदच्या 'जर्सी' वर चोरीचा आरोप; निर्मात्यांविरोधात लेखकाची कोर्टात धाव

शाहिद कपूर (Shahid Kapoor)अभिनित 'जर्सी'(jersey) सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडल्यानं आता सिनेमा २२ एप्रिल,२०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. आज सकाळीच म्हणेज ११ एप्रिल २०२२ रोजी ही बातमी कळाली. पण आता ईटाईम्सच्या वृत्तनुसार 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन लांबवणीवर पडण्यामागे मोठ कारण असल्याचा खुलासा होतोय. काय घडलं आहे नेमकं?

हेही वाचा: प्रतिक गांधी व पत्रलेखा अभिनीत बहुचर्चित 'फुले' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

लेखक रजनिश जैसवाल यांनी 'जर्सी' सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार नोंदवलीय की,''जर्सी सिनेमाची मूळ कथा-पटकथा त्यांची आहे. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती छगला यांच्यापुढे या केसची सुनावणी आज ११ एप्रिल रोजी होणार होती. म्हणूनच 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचं हे एक मुख्य कारण आहे असं म्हटलं जात आहे. जर्सी सिनेमाचं दिग्दर्शन गोथम तिन्नानुरीनं केलं आहे. तर सिनेमाचे निर्माते आहेत दिल राजू,एस.नागा वामसी आणि अमन गिल. निर्माते गील यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की,''आम्ही जर्सी साठी आमच्या रक्ताचं पाणी केलंय आणि आमच्या खूप जवळचा हा सिनेमा आहे जो जास्तीत-जास्त प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. म्हणूनच सगळा विचार करुन आम्ही २२ एप्रिलला सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे''.

हेही वाचा: आलियाच्या लग्नाची बातमी ऐकून चाहता बनला 'कबीर सिंग'; पहा कसा सैरभैर झालाय

'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर,मृणाल ठाकरू,शाहिदचे वडील अभिनेते पंकज कपूर अशी स्टारकास्ट दिसणार आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. खेळात अपयशी ठरलेला एक क्रिकेटर केवळ आपल्या मुलाला जर्सी गिफ्ट द्यायची आहे म्हणून वयाच्या तिशीनंतर जिद्दीनं पेटून उठतो अन् क्रिकेटचा स्टार कसा बनतो याचा प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. जर्सी सिनेमा सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार होतो. पण त्यावेळी कोरोनाचा नवीन विषाणू ओमीक्रॉननं डोकं वर काढल्यानं निर्बंध लादले गेले अन् निर्मात्यांनी सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. त्यानंतर आता १४ एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होणार होता पण KGF: Chapter 2 प्रदर्शित झाला आहे,त्यामुळे बॉक्सऑफिसवर एकमेकांचं नुकसान टाळण्यासाठी जर्सी च्या निर्मात्यांनी पुन्हा सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं आहे. पण आता सिनेमाविरोधात साहित्यचोरीचा आरोप केला जातोय,तक्रार केलीय अन् केस सुरु आहे म्हणून जर्सी लांबणीवर पडला हे कारण शाहिदच्या चाहत्यांसाठी धक्कादायकच ठरणार एवढं मात्र नक्की.

Web Title: Jersey Makers Accused Of Plagiarism Is That The Reason For The Delay In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..