"फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही तर.. "; 'जेठालाल'ची विनंती

दिलीप जोशी यांची चाहत्यांना विनंती
Dilip Joshi
Dilip Joshi

"जेव्हा लॉकडाउन संपेल, तेव्हासुद्धा लोकांना काळजीपूर्वक वागणं गरजेचं आहे. काहीच झालं नाही अशा आवेशात बाहेर फिरणं आणि बेजबाबदारपणे वागणं चुकीचं ठरेल", असं मत अभिनेता दिलीप जोशी Dilip Joshi यांनी मांडलं. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत जेठालालची Jethalal भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते दिलीप जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचे विचार मांडले. "फक्त सरकारला दोष देण्यापेक्षा लोकांनी जबाबदारपणे वागणे, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. जर फक्त सरकारवर टीका करत बसलो तर कोरोनाचं हे संकट कधीच संपणार नाही. त्यासाठी आपल्याला आधी नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे", असं ते म्हणाले. (jethalal aka Dilip Joshi says Dont blame the government)

लॉकडाउनमुळे अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र 'तारक मेहता..'च्या टीमने काही दिवस शूटिंग बंद ठेवण्याचं ठरवलं. या निर्णयाचं स्वागत करत ते पुढे म्हणाले, "काम सुरू राहील, पण लोकांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन शूटिंग करणाऱ्या टीम्सनी सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या महामारीने सर्वांनाच शिकवण दिली. सध्या कुटुंबीय आणि आपल्या स्वास्थ्यापेक्षा अधिक काहीच महत्त्वाचं नाही. आपण निसर्गाला गृहित धरून वागत होतो आण आता या कोरोनामुळे आपण धडा शिकायला हवा."

हेही वाचा : अजुनही यौवनात मी! ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींचा 'व्हेकेशन मोड ऑन'

दिलीप जोशी यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते अमित मिस्त्री यांचे नुकतेच निधन झाले. "तो ठणठणीत होता आणि कोणत्याही शारीरिक समस्या त्याला नव्हत्या. त्यामुळे त्याचं निधन हा माझ्यासाठी सर्वांत मोठा धक्का आहे. तो नेहमी वर्कआऊट करायचा, फिट राहायचा, तरी त्याचं निधन कार्डिअॅक अरेस्टने झालं. यावर मला अजूनही विश्वास बसत नाहीये", अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com