Nora Fatehi: काय फालतु ड्रेस घातलाय! नोरा फतेही पुन्हा झाली ट्रोल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhalak Dikhhla Jaa 10 judge Nora Fatehi trolled for wearing red bodycon dress with plunging neckline

Nora Fatehi: काय फालतु ड्रेस घातलाय! नोरा फतेही पुन्हा झाली ट्रोल..

nora fatehi trolled: नोरा फतेही हे नाव घेतले तर आपल्या समोर येते अप्रतिम नृत्य आणि वेगळा फॅशन सेन्स, मग ती फॅशन कोणतीही असो. पण नोराने अशी फॅशन केली आहे ज्यावरून तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. नुकताच तिने एक लाल ड्रेस परिधान केला तो पाहून चाहते तिची खिल्ली उडवत आहेत. तिने केलेली स्टाइल तिला तरी समजली आहे का असा प्रश्न चाहत्यांनी केला आहे.

(Jhalak Dikhhla Jaa 10 judge Nora Fatehi trolled for wearing red bodycon dress with plunging neckline)

नोरा फतेहीचा इंस्टाग्राम हँडलवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. त्यामध्ये नोराने लाल किल्ला बॉडीकॉन ड्रेस घातला आहे .ती खुप हॉट आहे. पण नोराच्या या ड्रेस मधे ती क्लीवेज शो करत आहे. त्यामुळे तिचा हा ड्रेस पाहून नेटिझन्स म्हणाले नोराचा हा लुक फेल गेला आहे.

तिने तिचे केस पोनीटेलमध्ये घातले होते आणि तिचा मेकअप गेम पॉइंटवर दिसत होता. तिने तिचा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच, नेटिझन्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली, खरं तर, काही नेटिझनने तिची निंदा करण्यासाठी टोकाची पातळी गाठली. एका रागावलेल्या नेटिझनने लिहिले,  "किती ओवरअॅक्टिंग करते आहे" तर एकाने लिहिले आहे" नोरा खुप फालतु ड्रेस घातला आहे" तर दुसरा म्हणतो "नोरा तुझ्या क्लीवेजची भुरळ पडली नाही, बॉलिवुडचा अंत या नोराने केला फालतु ड्रेस घालून" अशा कमेंट तिच्या ड्रेस वर आल्या आहेत.