'झुंड'मध्ये अमिताभ यांच्यासोबत 'परशा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

नागपूर - नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगचा माहौल नागपुरात सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन तब्बल ३४ दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. ‘झुंड’मध्ये अभिनयाचा शहेनशहा अमिताभ बच्चनसोबत ‘सैराट’मधील परशा (आकाश ठोसर)  झळकणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मोहननगर येथील शाळेत बनविण्यात आलेल्या सेटवर तब्बल दहा ते बारा दिवस परशा फुटबॉल खेळताना दिसला. विशेष असे की, परशा निगेटिव्ह रोलमध्ये झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या अपेक्षेने चाहते दररोज येतात. दिवसभर थांबतात. परंतु, मंगळवारी नागपूरपासून दोन तासांच्या अंतरावर शूटिंग असल्यामुळे शाळेच्या आवारात शुकशुकाट होता. मंगळवारी कोणीही उपस्थित नव्हते.

मात्र, येथे उपस्थित एका चाहत्याने ‘अमिताभ तो नहीं दिखा, परशा का दर्शन कुछ दिन पहिले हुआ था,’ परशा फुटबॉल टीमसोबत हाणामारीच्या दृश्‍यात असल्याचेही त्याने सांगितले. अमिताभ यांच्यावरच सारे लक्ष असल्याने ‘सैराट’ फेम ‘परशा’ नागपुरात आहे, याकडे कोणाचेही लक्ष पोहोचले नाही. परशासोबत सुमित गेडाम या युवकाने फोटो काढला. याशिवाय झोपडपट्टीतील मुलांनी फोटो काढून घेतले. 

बच्चनसोबत मुले पावसात 
‘बिग बी’ला पाहण्यासाठी शहरात जिथे शुटिंग असेल तिथे धावपळ सुरू आहे. मात्र, झोपडपट्टीतील मुलांना शूटिंगच्या वेळा अक्षरश: पावसात भिजलेले अमिताभ बघण्याची संधी मिळाली. चिमुकल्या मुलांनीही काही दिवसांपूर्वी हा आनंद लुटला. यावेळी अनेक मुलांनी बच्चन यांना बघितल्याचे कुतूहल आपल्या आईबाबांना सांगितले. 

बिग बी यांचा दोन तासांचा प्रवास
मंगळवारी बिग बी यांनी ‘झुंड’च्या शूटिंगसाठी दोन तासांचा प्रवास केला. यापूर्वी कोंढाळी, कोराडी परिसरात झुंडचे शूटिंग झाले. खेड्यातील लोकांना बिग बीचे दर्शन होत आहे. मात्र, महानायकाच्या दर्शनापासून दूर असल्यामुळे शहरातील चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jhund Movie Amitabh Bachchan Akash Thosar Entertainment