झुंड ओटीटीवर प्रदर्शित होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील...|Jhund Movie SC Refuses stop streaming | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhund Movie SC Refuses

झुंड ओटीटीवर प्रदर्शित होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील....

Bollywood Movie: झुंड चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागराज मंजुळे कोर्टाच्या फेऱ्यात अडकले होते. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन झुंडची निर्मीती करणाऱ्या नागराज यांचा हा चित्रपट ओटीटीवर (OTT) (Amitabh Bachchan) प्रदर्शित होणार होता. मात्र त्यावरुन वादाला सुरुवात झाली अन तो वाद कोर्टापर्यत गेला होता. पहिल्यांदा कोर्टानं त्यावरील सुनावणी पुढे (Social media) ढकलली होती. आता कोर्टानं झुंडला हिरवा कंदील दिला आहे. एएनआयनं केलेल्या व्टिटमध्ये यापुढील काळात झुंडच्या विरोधात ओटीटीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्याबाबत मतप्रदर्शन केलं आहे. तसेच ओटीटीवर झुंड दाखवला जाऊ नये अशी जी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. ती कोर्टानं फेटाळून लावली आहे.

नागराज यांचा 'झुंड'(Jhund) ६ मे रोजी ओटीटी(OTT) वर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात होतं. पण या सिनेमाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणीची प्रतिक्षा होती. झुंडचं ओटीटी प्रदर्शन थांबवावं यासाठी तेलंगणा हायकोर्टानं दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ वकील सी.आर्यमा सुंदरम यांनी या याचिकेवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी मागणी केली आहे. सिनेमागृहात 'झुंड' खरंतर याआधीच प्रदर्शित झाला आहे. पण याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत अद्याप गोंधळ सुरुच आहे.

६ मे रोजी सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार होता. शुक्रवारी हायकोर्टानं एका ओळीचा आदेश पारित केला होता. त्यांना या सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनासाठी काही बाबतीत तडजोड करायची आहे. खरंतर सिनेमाच्या प्रदर्शनाबाबतचं त्यांचं आव्हान याआधीच फेटाळलं गेलं आहे. असं निवेदनही सी. सुंदरम यांनी दिलं आहे. या निवेदनावरच उद्या सरन्यायाधीशांनी सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे. 'झुंड' निर्मात्यांविरोधात कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका हैदराबादमधील सिनेनिर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी दाखल केली होती. २९ एप्रिल रोजी श्री.सुधा यांच्या खंडपीठानं या याचिकेवर आदेश दिला होता. या आदेशात हायकोर्टानं म्हटलं होतं की,''या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे ८ जून,२०२२ पर्यंत दोन्ही पक्षांकडून स्थगिती कायम ठेवू''.

'झुंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतानाही विरोध करण्यात आला होता. नंदी कुमार यांनी याआधी 'झुंड'च्या निर्मात्यांविरोधात एका प्रकरणात सामंजस्य अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. आणि यावरंन सिनेमा प्रदर्शनाला विरोधही दर्शिविला होता. मात्र तेव्हा ट्रायल कोर्टानं त्यांची विनंती नाकारत सिनेमा प्रदर्शनाला संमती दिली होती. त्यानंतर 'झुंड' ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.