
Jhund: 6 मे रोजी 'झुंड' OTT वर नाहीच? सुप्रीम कोर्टात ठरणार भवितव्य
नागराज मंजुळे(Nagraj manjule) दिग्दर्शित 'झुंड'(Jhund) येत्या ६ मे रोजी ओटीटी(OTT) वर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता यामध्ये आडकाठी येतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सिनेमाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी आव्हान दिलेल्या याचिकेवर उद्या बुधवारी सुप्रीम कोर्टात(Supreme Court) सुनावणी होणार आहे. झुंडचं ओटीटी प्रदर्शन थांबवावं यासाठी तेलंगणा हायकोर्टानं दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ वकील सी.आर्यमा सुंदरम यांनी या याचिकेवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी मागणी केली आहे. सिनेमागृहात 'झुंड' खरंतर याआधीच प्रदर्शित झाला आहे. पण याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत अद्याप गोंधळ सुरुच आहे. ६ मे रोजी सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार होता. शुक्रवारी हायकोर्टानं एका ओळीचा आदेश पारित केला होता. त्यांना या सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनासाठी काही बाबतीत तडजोड करायची आहे. खरंतर सिनेमाच्या प्रदर्शनाबाबतचं त्यांचं आव्हान याआधीच फेटाळलं गेलं आहे. असं निवेदनही सी. सुंदरम यांनी दिलं आहे. या निवेदनावरच उद्या सरन्यायाधीशांनी सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा: सैफला सतावतेय मोठा मुलगा इब्राहिमची चिंता; म्हणाला,'मी प्रार्थना करतो...'
'झुंड' निर्मात्यांविरोधात कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका हैदराबादमधील सिनेनिर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी दाखल केली होती. २९ एप्रिल रोजी श्री.सुधा यांच्या खंडपीठानं या याचिकेवर आदेश दिला होता. या आदेशात हायकोर्टानं म्हटलं होतं की,''या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत म्हणजे ८ जून,२०२२ पर्यंत दोन्ही पक्षांकडून स्थगिती कायम ठेवू''.
'झुंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होतानाही विरोध करण्यात आला होता. नंदी कुमार यांनी याआधी 'झुंड'च्या निर्मात्यांविरोधात एका प्रकरणात सामंजस्य अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. आणि यावरंन सिनेमा प्रदर्शनाला विरोधही दर्शिविला होता. मात्र तेव्हा ट्रायल कोर्टानं त्यांची विनंती नाकारत सिनेमा प्रदर्शनाला संमती दिली होती. त्यानंतर 'झुंड' ४ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. नंदी कुमार यांनी त्यानंतर हाय कोर्टात धाव घेतली आणि २९ एप्रिल रोजी अंतरिम आदेश पारित करण्यात आले. आता सिनेमा ६ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे त्याआधी ही सुनावणी लागलीच पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
Web Title: Supreme Court To Hear Tomorrow Plea Challenging Stay On Jhund Movies Ott
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..