'लाल सिंग चढ्ढा'च्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांचं ट्विट, पण झाली मोठी चूक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad tweeted to support lal singh chaddha and criticize the kashmir files

'लाल सिंग चढ्ढा'च्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांचं ट्विट, पण झाली मोठी चूक..

आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा(lal singh chaddha) वरुन सध्या भारतात सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. या चित्रपटावर एका विशिष्ट गटाकडून टाकण्यात आलेला बहिष्कार चित्रपटाला चांगलाच महागात पडला आहे. काही लोक या चित्रपटाला समर्थन देखील दर्शवत आहेत. पण त्या समर्थन दर्शवणाऱ्या कलाकारांच्या चित्रपटावरही बहिष्कार टाकू, असा सूर समोर येत आहे. पण या सगळ्याच्या विरोधात जाऊन आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'लाल सिंग चढ्ढा'ला समर्थन दर्शवले आहे. एवढेच नाही तर 'द काश्मीर फाइल्स' (the kashmir files) चित्रपटाचे उदाहरण देऊन भक्तांना चांगलाच टोला लगावला आहे. पण ते करताना भक्तांनीही त्यांची एक चूक हेरून त्यांची कोंडी केली आहे. (jitendra awhad tweeted to support lal singh chaddha and criticize the kashmir files)

गेल्या काही महिन्यात दोन चित्रपट सर्वाधिक चर्चेत ठरले. ते म्हणजे 'द काश्मीर फाइल्स' आणि आताचा 'लाल सिंग चढ्ढा'. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबाबत वाच्यता करणाऱ्या 'काश्मीर फाईल्स' या चित्रपटाला हिंदुत्ववाद्यांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. तर त्याच गटाकडून आमीर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा'ला प्रचंड विरोध झाला. आमीर खानच्या (aamir khan) देशभक्तीवर शंका उपस्थित करून चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला. याच सर्व प्रकारावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.

ते म्हणतात, 'भक्तांनी डोक्यावर घेतलेल्या 'काश्मीर फाईल्स'पेक्षा, त्यांनी बहिष्कार घातलेल्या 'लालसिंग चढ्ढा'ने जास्त पैसा कमावला. ७.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे साधारण ६००० कोटी रुपये! भक्तांच्या मताला फारशी किंमत राहिलेली नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे.' या ट्विट द्वारे त्यांनी 'लाल सिंग चढ्ढा'ला समर्थन दिलेच शिवाय 'काश्मीर फाइल्स' बाबतही नाराजी व्यक्त केली आहे.

पण हे ट्विट करताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. ७.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६००० कोटी नाही तर ६० कोटी होतात. जितेंद्र आव्हाड यांनी ६००० कोटी असा उल्लेख केल्याने नेटकरी चांगलेच भडकले आहेत. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. चुकीचा संदर्भ देऊन आव्हाड यांनी चुकीचे ट्विट केल्याने काही भक्तांनी कमेंट करत त्यांची चांगलीच कोंडी केली. अखेर आव्हाड यांना हे ट्विट डिलिट करावं लागलं.

Web Title: Jitendra Awhad Tweeted To Support Lal Singh Chaddha And Criticize The Kashmir Files

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..