Jitendra Joshi: 'माणसाचं पहिलं नातं कोणाशी?', जितेंद्र जोशी स्पष्टच बोलला...Godavari Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Joshi

Jitendra Joshi: 'माणसाचं पहिलं नातं कोणाशी?', जितेंद्र जोशी स्पष्टच बोलला...

Jitendra Joshi: अनेक पुरस्कारांनी गौरविलेला 'गोदावरी' सिनेमा नुकताच रिलीज झालेला आहे. या सिनेमामुळे सध्या अभिनेता जितेंद्र जोशीची देखील चर्चा होताना दिसतेय. जितेंद्रनं गोदावरी सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सध्या जितेंद्र जोशीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओत जितेंद्रनं नात्यांवर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. या व्हिडीओत त्यानं जे काही सांगितलंय ते व्हिडीओ पूर्ण पाहिल्यावर १०० टक्के खरं आहे हे आपण देखील म्हणाल.

हेही वाचा: 'आता पुढे जायची वेळ आली...',प्राजक्ता माळीचा नजरेतूनच इशारा

सोशल मीडियावर जितेंद्र जोशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं आपलं पहिलं नातं निसर्गाशी आहे हे सांगताना मार्मिक विचार शेअर केले आहेत. तो म्हणाला आहे,'माणसांनी ठरवलंय हे म्हणजे असं नातं,या नात्याचं असं होतं,त्या नात्याचं तसं व्हायला पाहिजे,पण या नात्याच्या पलिकडेही काही गोष्टी आहेत आणि त्या बघता आल्या पाहिजेत''.

''माणसाचं सर्वप्रथम नातं कोणाशी, तर निसर्गाशी आहे. कारण माणूस रोज ऑक्सिजन घेतो,पाणी पितो,माणूस उत्सर्जन करतो. ही जी पंचमहाभूतं आहेत. रोज पृथ्वीचा आपल्या पायाला स्पर्श होतो, आपण जमिनीवर बसतो. आकाश,पृथ्वी,जल,वायू या सगळ्या तत्वांचा समावेश आपल्या शरीरात आहे. म्हणूनच आपलं पहिलं नातं असेल तर ते निसर्गाशी आहे. वसुधेव कुटुंबकम्...असं म्हणणारी संस्कृती आहे आपली. वसुधेव म्हणजे ही जी पृथ्वी आहे आपली, ही एक कुटुंब आहे...''.

  हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

जितेंद्र जोशीच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकानं लिहिलंय, 'हे खरंय, आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय हे आपलं दुर्दैवं'. तर आणखी एकानं लिहिलंय,'तू नेहमीच भारी बोलतोस जितू...'