'आपला एखादा मित्र सोडून गेल्यावरती...'; जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट चर्चेत Jitendra Joshi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Joshi emotional post on Famous Director Nishikant Kamat Death Anniversary, Godavari release date

'आपला एखादा मित्र सोडून गेल्यावरती...'; जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट चर्चेत

JItendra Joshi: अभिनेता जितेंद्र जोशी(Jitendra Joshi) यांनी आज सोशल मीडियावर त्यांच्या बहुचर्चित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशी यांनी त्यांचे दिवंगत मित्र, प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.(Jitendra Joshi post, 'Godavari' Marathi Movie release date)

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित 'गोदावरी' हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार यात आहेत.

हेही वाचा: 'दीया और बाती' फेम कनिष्का सोनीनं स्वतःशीच केलं लग्न; म्हणाली,'मला पुरुष..'

जितेंद्र जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं. आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे”

हेही वाचा: Liger: विजय देवरकोंडावर भडकले लोक; म्हणाले,'बंद कर सगळी नाटकं...'

आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. अलीकडेच, या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला.

हेही वाचा: Laal Singh Chaddha चे नाव का जोडले जातेय पाकिस्तानशी? समोर आली मोठी माहिती

याचबरोबर गोदावरीचा जागतिक प्रीमियर व्हँकुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ आणि एशिया पॅसिफिक प्रीमियर न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये झाला होता.

Web Title: Jitendra Joshi Post Godavari Marathi Movie Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..