
'ज्या गोष्टींचं स्वप्नही पाहिलं नव्हतं..' कान्स मधून जितेंद्र जोशी..
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणारा कान्स (cannes 2022) चित्रपट महोत्सव फ्रांस मध्ये अत्यंत दिमाखात सुरु आहे. यंदा या चित्रपट महोत्सवात भारतातील सहा चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यात 'गोदावरी' (godavari marathi movie) या मराठी चित्रपटाचासुद्धा समावेश होता. मराठी चित्रपटांसाठी हि मोठी अभिमानाची बाब ठरली. सध्या 'गोदावरी'वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा चित्रपट सोमवारी कान्स मध्ये दाखवण्यात आला. (godavari movie in Cannes) यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (amit deshmukh in cannes) देखील उपस्थित होते. हा भावनिक क्षण अभिनेता जितेंद्र जोशीने एका पोस्टद्वारे मांडला आहे. (jitendra joshi shared feeling after 'godavari' movie screening in Cannes 2022 nsa95)
हेही वाचा: 'कलाकारांपेक्षा घोडीच महाग..' प्रवीण तरडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'आयुष्यात ज्या गोष्टीचं स्वप्न सुद्धा पाहिलं नाही ती गोष्ट प्रत्यक्षात आली. भारत सरकार तर्फे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे 6 सिनेमे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवण्यात आले त्यापैकी आपला गोदावरी आज येथे दाखवण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित भैया देशमुख आणि वहिनी नीस या कान्स पासून 45 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शहरावरून केवळ गोदावरी पाहण्यासाठी सकाळच्या 9.30 च्या शो साठी आवर्जून आले. त्यांच्या सोबत वेगवेगळ्या देशातील अनेक लोकांना आपला सिनेमा खूप आवडला. मला आणि निखिल ला हा अनुभव दिल्याबद्दल मी वैश्विक शक्ती चे आभार मानतो. विश्र्वभरातील अनेक मान्यवरांसोबत एकात्मतेचा हा अनुभव अवर्णनीय आहे. ईश्वराची कृपा आहे.' अशी भावना जितूने व्यक्त केली आहे.
पुढे तो म्हणतो, 'ता. क. माझ्या वेशभूषेकरिता माझ्या पत्नीने खूप मेहनत घेतली ज्यामुळे इथले अनेक लोक मला प्रेम देते झाले . तिचे ही आभार. सिनेमा झिंदाबाद!!' अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले आहे. जितेंद्र जोशीची पहिलीच निर्मिती असलेल्या 'गोदावरी' या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आल आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२मध्येही 'गोदावरी' चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली तर सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं २०२१ च्या इफ्फीमध्येसुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरल आहे.
Web Title: Jitendra Joshi Shared Feeling After Godavari Movie Screening In Cannes 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..