
'कलाकारांपेक्षा घोडीच महाग..' प्रवीण तरडेंनी सांगितला भन्नाट किस्सा
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ (sarsenapati hambirao) चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा स्वराज्याचे सरसेनापती अशी ख्याती असलेल्या हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. याच निमित्ताने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे (pravin tarde) यांनी चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. (pravin tarde interview)
हेही वाचा: PHOTO : हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे 'ते' फोटो पाहिले का?
तरडे म्हणाले, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. ऐतिहासिक सिनेमांचा बजेट हाच हिरो असतो. आम्ही जे या चित्रपटासाठी घोडे वापरले त्यांचा दिवसाचा खर्च हा कलाकारांच्या मानधनापेक्षा अधिक होता. मुंबईवरुन हे घोडे एसी ट्रकमध्ये सेटवर यायचे. घोड्याचा सीन शूट करून झाला की पुन्हा तो एसी ट्रकमध्ये जायचे.”
(pravin tarde on sarsenapati hambirrao movie )
पुढे ते म्हणाले, 'अजय देवगणने ‘तानाजी’ चित्रपटासाठी जी घोडी वापरली तिच मी या चित्रपटासाठी वापरली. रोल साऊंड असं घोडीने ऐकलं की ती तयार होते आणि एक्शन म्हटलं की पळते. घोडीबरोबर असणारा माणूस तिच्या कानात जाऊन सगळ्या सूचना देतो. कट म्हटलं की ही घोडी लगेच थांबते. आपल्याकडे काही कलाकारांना कट म्हटलं की थांबायचं असतं हे अजूनही कळत नाही. पण घोडी मात्र कट शब्द ऐकताच थांबते. घोडीचं डाएट देखील वेगळं होतं. मोठ्या गोष्टी करायच्या म्हंटलं की खर्च होतोच.' असा किस्सा त्यांनी रंगवला.
Web Title: Pravin Tarde Says We Use Very Expensive Horse For Sarsenapati Hambirrao Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..