Saurabh Chaugule: तिचे डोळे बंद केले अन्... ताज हॉटेलात आईच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याचं जंगी सेलिब्रेशन

सौरभने आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी खास सेलिब्रेशन केलंय
Saurabh Chaugule, Saurabh Chaugule news, Saurabh Chaugule mother, jiv maza guntala
Saurabh Chaugule, Saurabh Chaugule news, Saurabh Chaugule mother, jiv maza guntala SAKAL
Updated on

Saurabh Chaugule Mother News: जीव माझा गुंतला मालिकेतील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे सौरभ चौगुले. सौरभ अनेकदा सोशल मीडियावर आई बाबा आणि कुटुंबाचे फोटो पोस्ट करत असते. अशातच सौरभने एक फोटो पोस्ट केलाय.

सौरभने आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी खास सेलिब्रेशन केलंय. याचा सगळा अनुभव सौरभने सोशल मीडियावर शेयर केलाय.

Saurabh Chaugule, Saurabh Chaugule news, Saurabh Chaugule mother, jiv maza guntala
Anupam Mittal Father: शार्क टॅंक फेम अनुपम मित्तल यांच्या वडिलांचं निधन

सौरभ लिहितो..काही दिवसांपूर्वीच मम्मीचा वाढदिवस झाला. दरवर्षी मम्मी माझ्या वाढदिवसाला काही ना काही तरी स्पेशल करायची जसं शॉपिंग करून देणार किंवा एक मोबाईल घेऊन देणार.

गेले दोन वर्ष कोल्हापुरात शूट करत होतो, म्हणून तिच्या वाढदिवसाला राहता नाही आलं आणि आमचा शो मुंबईत आला तेव्हा ठरवलं की मम्मीसाठी काहीतरी स्पेशल करायचं पण करणार काय काहीच कळत नव्हतं ,असंच एक प्लान केला की मम्मीला ताज हॉटेल ला घेऊन जायचं. तेही तिला न सांगता- एक सरप्राईज.

Saurabh Chaugule, Saurabh Chaugule news, Saurabh Chaugule mother, jiv maza guntala
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर एकदम खुश.. मुलाच्या पहिल्या सिनेमातलं रोमँटिक गाणं केलं शेअर

सौरभ पुढे लिहितो... "फोटो काढायला जातोय मरीन लाईन्सला असं सांगून जसं मरीन लाईन जवळ आलो तिच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि तिथेच ताज हॉटेलच्या दारात जाऊन उघडली.

तिला कळेना की आपण कुठे आलोय, पण जेव्हा तिला सांगितलं तिला काय रिऍक्ट करावा ते कळलंच नाही!

आत मध्ये जाऊन फूड ऑर्डर करणं सोडून तिने सगळ्यात आधी आपल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना फोन करून सांगितलं की सौरभ मला ताज हॉटेल ला घेऊन आलाय बर्थडे साठी तिला इतकं आनंदी कधीच पाहिलं नव्हतं.

सौरभ शेवटी लिहितो.. "ती ऑफिसला ताज जवळच होती. पण ती कधी ताज मध्ये गेली नाही. आज गेली तर आनंद तिच्या चेहऱ्यावरून झळकत होता.

फोटो काढायची अवाड म्हणून हॉटेल मध्ये सगळ्या ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात फोटोज् काढले.पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिलंय.

तिला असं आनंदी बघून मी अजून काय करू हिच्यासाठी तेच कळत नव्हतं पण एक नक्की ही एक सुरुवात आहे अजून खूप काही करायचंय तुझ्यासाठी मम्मी...

PS. तिला सरप्राइज खूप आवडलं हे घरी गेल्यावर माझ्या रूम मध्ये मी कार पार्क करून येण्याआधीच AC चालू करून ठेवला होता ह्यावरून कळलं..." अशी खास पोस्ट सौरभने आईसाठी लिहिली आहे.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com