जोआक्विन फोनिक्स दिसणार नेपोलियन बोनापार्टच्या भूमिकेत

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

कुणी काहीही म्हटलं तरी जोआक्विन फोनिक्सचा जोकरमधला अभिनय हा प्रभावी होता. त्यामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचे जगभर नाव झाले. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे त्याला अभिनयाचे ऑस्कर मिळाले.

मुंबई-जोकर या चित्रपटातील जबरदस्त भूमिकेमुळे सर्वांच्या पसंतीस उतलेला जोआक्विन फोनिक्स आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जगप्रसिध्द सेनानी नेपोलियन बोनापार्टची भूमिका त्याला मिळाली आहे.  रिडले स्कॉट यांच्या किटबॅग या चित्रपटातून त्याचे आगळे रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. जोआक्विन फोनिक्सचे ऑस्करमधील भाषणही चर्चेत आले होते. त्यावरुन बराचकाळ ऑस्कर अॅवॉर्डबद्दलच्या गप्पा चित्रपट रसिकांमध्ये रंगल्या होत्या.

कुणी काहीही म्हटलं तरी जोआक्विन फोनिक्सचा जोकरमधला अभिनय हा प्रभावी होता. त्यामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचे जगभर नाव झाले. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे त्याला अभिनयाचे ऑस्कर मिळाले. आता सध्या त्याच्याकडे मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची रांग लागली आहे. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते रिडले स्कॉट यांच्या किटबॅग या चित्रपटाचे. फ्रान्सचा शूर सेनानी नेपोलियन बोनापार्ट याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती ते करत आहे. यात त्यांनी नेपोलियनच्या भूमिकेसाठी जोआक्विन फोनिक्सला करारबध्द केलं आहे.

 रिडले स्कॉट यांनी यापूर्वी ग्लॅडिएटर या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यालाही ऑस्कर मिळाले होते. रसेल क्रोच्या अभिनयाने ग्लॅडिएटरची उंची आणखी वाढवली होती. एक थरारक अनुभव देणारा चित्रपट म्हणून ग्लॅडिएटरकडे पाहिले गेले. विशेष म्हणजे या चित्रपटात फोनिक्सने कमोडुसची भूमिका केली होती. या छोट्याशा भूमिकेनेही त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉटच्या या चित्रपटात नेपोलियन बोनापार्टचा उदय, त्याचा प्रवास आणि तो जगज्जेता सेनापती होण्यापर्यतचा संघर्ष याचा विस्तृत पट मांडण्यात येणार आहे. त्याच्या चित्रिकरणाला पुढील वर्षापासून सुरुवात होणार आहे.  दरम्यान, जोआक्विन फोनिक्सच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याला मुलगा झाला आहे.  फोनिक्सने त्याचे नाव रिव्हर असे ठेवले आहे.  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joaquin Phoenix roped in to play Napoleon Bonaparte

Tags
टॉपिकस
Topic Tags: