Oscar 2020 : ऑस्करलाही भावला जोकर; जोकीन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ठ अभिनेता

Joaquin Phoenix wins Best Actor for his work in joker on Oscar 2020
Joaquin Phoenix wins Best Actor for his work in joker on Oscar 2020

लॉस एंजेलिस : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत अशा ऑस्कर पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य सोहळा आज (ता. १०) लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. ऑस्करचे यंदाचे ९२वे वर्ष असून दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. ऑस्करमधील सर्वात प्रतिष्ठीत असा मानाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 'जोकर'फेम जोकीन फिनिक्सला मिळाला. जोकर चित्रपटाला सर्वाधिक मानांकने होती. जोकीन याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच ऑस्कर आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी जेल्वेगरला जुडी या चित्रपटासाठी मिळाला आहे.  

सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण ११ विभागांमध्ये जोकरने नामांकन मिळवली होती. तसेच ओरिनल स्कोअर विभागातही जोकरच्या हिल्डर गुनाडोटिआर हिला पुरस्कार मिळाला आहे. जोकरसह पॅरासाईट, वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका या चित्रपटांचा डंका यावेळी ऑस्करवर आहे. पहिल्यापासूनच जोकीन हा पुरस्कार पटकावणार अशी चर्चा होती, त्याप्रमाणे त्याने हा पुरस्कार मिळवला. त्याच्या अभिनयाच्या जोरावर जोकर चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. पुरस्कार घेताना तो भावूक झाला होता. तसेच त्याला मदत केलेल्या सर्वांचे त्याने आभार मानले. 

ऑस्करमधील पहिला पुरस्कार हॉलिवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिट याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मिळाला. 'वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका' या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेसाठी त्याला हा सन्मान मिळाला. ब्रॅड पिटसह सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्न हिला मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मिळाला.

तर पॅरासाईट या बहुचर्चित चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म हा पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा अॅवॉर्ड '1917' या चित्रपटाला मिळाला आहे. तर हेअर लव्ह या चित्रपटाला बेस्ट शॉर्टफिल्मचा किताब मिळाला आहे. तर बेस्ट अॅनिमेटेड मूव्ही 'टॉय स्टोरी ४' ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com