esakal | जोधा अकबरमधील अभिनेत्री मनीषा यादव यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

जोधा अकबरमधील अभिनेत्री मनीषा यादव यांचे निधन

जोधा अकबरमधील अभिनेत्री मनीषा यादव यांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

टीव्ही मालिका 'जोधा अकबर' (jodha akbar) मध्ये सलीमा बेगमची (salima begum) भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मनीषा यादव (manisha yadav) यांचे १ऑक्टोबर रोजी निधन झाले. मनीषा यादव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मनीषा यादव यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मनीषा यादवची को-स्टार परिधी शर्मा यांनी या दु: खद बातमीला दुजोरा दिला आहे. परिधी शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मनीषा यादवचे फोटो शेअर करत लिहिले, 'ही बातमी खूप हृदयद्रावक आहे. RIP मनीषा यादव.'

परिधी शर्मा म्हणाली, “आमचा शो बंद झाल्यानंतर मी तिच्या संपर्कात नव्हते. पण आमचा मुघल नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये शोमधल्या सर्व अभिनेत्री संपर्कात होतो आणि जर कोणी आमच्याशी संबंधित काही महत्वाचे शेअर करू इच्छित असेल तर आम्ही ते ग्रुपवर करायचो. काल मला या ग्रुपमधूनच या बातमीची माहिती मिळाली आणि मला धक्का बसला. '' मनीषा यादवने गेल्या जुलैमध्ये आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला. तिने आपल्या ट्विटर हँडलवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मनीषा यादवने लिहिले, 'माझ्या मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील कठीण काळात तू प्रकाशासारखा आहेस. मला तुझी आई असल्याच धन्य वाटते.' त्याचवेळी मनीषा यादवने बर्थडे सेलिब्रेशनचे ट्विट केलं होतं.

मनीषाच्या जाण्यानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी तिला श्रद्धांजलीही वाहिली आहे. तिच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आजाराचा खंबीरपणे सामना करणाऱ्या मनीषा यांच्या जाण्यानं त्यांच्या चाहत्यानं देखील शोक व्यक्त केला आहे.

loading image
go to top