
हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅान इब्राहीम.
मुंबई- हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅान इब्राहीम. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच्या सत्यमेव जयते, परमाणु, बाटला हाऊस या देशभक्ती पर चित्रपटातून जॅानने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
कोरोनामुळे जॅानचे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नव्हते. अटॅक, सत्यमेव जयते 2, मुंबई सागा या जॅानच्या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.पण आता महाराष्ट्र शासनाने चित्रपटगृहांची आसन क्षमता 100 टक्के केल्याने हे चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शशांक केतकरला पुत्ररत्न; फोटो शेअर करून सांगितलं खास नाव
लवकरच जॅान इब्राहिम आणि इमरान हाश्मीचा मुंबई सागा हा चित्रपट रिलीज होणार आहे.हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती.पण चित्रपटगृहांची आसन क्षमता 100 टक्के झाल्याने या चित्रपटांच्या निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 19 मार्च 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटाच्या स्पेशल इफेक्टवर काम चालू असून मी आणि माझी टिम या चित्रपटावर खूप मेहनत घेत आहे,लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, असे संजय गुप्ताने ट्विट करून सांगितले आहे.
Reminder of something I said on 02/11/20.
Still stand by it. https://t.co/FWLzD5WXuQ— Sanjay Gupta (@_SanjayGupta) February 21, 2021
नुकताच हा चित्रपट अॅमेझोन प्राईमला 65 कोटीला विकला आहे. त्यामुळे हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमला प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा सुरू होती या चित्रपटात 80 च्या दशकातील गॅंगवार दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मीती भूषण कुमार, कृष्णन कुमार, संगिता आहिर आणि अनुराधा गुप्ता यांनी केले आहे.