शशांक केतकरला पुत्ररत्न; फोटो शेअर करून सांगितलं खास नाव

shahank ketkar.
shahank ketkar.

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा प्रसिद्ध कलाकार म्हणजे शशांक केतकर. शशांकने २५ डिसेंबरला पत्नी प्रियांका केतकरने प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ख्रिसमसच्या दिवशी ही बातमी शेअर केल्याने सांताक्लॅाज येणार अशी कमेंट चाहत्यांनी केली होती. त्यावेळी शशांक आणि प्रियांकाला सर्वांनी शुभेच्छांचा दिल्या.

नुकताच शशांकने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शशांकने बाळाला जवळ घेतले आहे. या फोटोला शशांकने 'ऋग्वेद शशांक केतकर' असे कॅप्शन दिले. या फोटोमधून शशांकने त्याला मुलगा झाला असून त्याचे ऋग्वेद असे नाव ठेवले आहे ही गोड बातमी दिली. त्यानंनंतर शशांक आणि प्रियांकावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अभिनेता जितेंद्र जोशीने 'यासारखा दुसरा आनंद नाही' अशी कमेंट करून शुभेच्छा दिल्या.अनेक सेलिब्रेटींनी शशांक आणि प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत. शशांकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा हिरव्या रंगाच्या हार्ट शेप इमेजीमध्ये लपवला आहे. शशांकच्या अयुष्यातील अनंदी क्षण या फोटोमध्ये दिसत आहे. 

सोशल मीडियावर शशांक आणि प्रियांका नेहमीच सक्रिय असतात. 2017 मध्ये या दोघांचे लग्न झाले. 'होणार सून मी या घरची', 'हे मन बावरे' या मालिकांमधून शशांकला प्रसिध्दी मिळाली. लवकरच शशांक 'पाहिले न मी तुला'या मालिकेमध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com