जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूरचे 'गल्ला गोरियां'...

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 June 2020

हिंदी चित्रपटसृष्टीत मॅचो मॅन म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूर यांनी बाटला हाऊस या चित्रपटात एकत्रित काम केले होते.

मुंबई ः हिंदी चित्रपटसृष्टीत मॅचो मॅन म्हणून ओळखला जाणारा जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकूर यांनी बाटला हाऊस या चित्रपटात एकत्रित काम केले होते.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ती जोडी पुन्हा एकत्र आली आहे 'गल्ला गोरियां' या गाण्यासाठी. टी सीरीज या कंपनीने गे धमाल आणि मजेदार असे पार्टी साँग्ज बनविले आहे. 

वाचा ः पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार? आयआयटी मुंबईचा नवा अंदाज; वाचा नेमकं काय आहे तर...

भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या या गाण्याचा व्हिडीओ आदिल शेख यांनी दिग्दर्शित केला आहे. लंडन येथील संगीतकार व गायक ताज आणि धावणी भानुशालीने हे गाणे बनविले आहे. हे एक पार्टी साँग आहे आणि या गाण्यातील जॉन आणि मृणालचे कॉश्च्युम्स ड्रेस रंगीबेरंगी आहेत. दोघांनीही धमाकेदार डान्स या गाण्यावर केला आहे. याबाबत मृणाल ठाकूर म्हणाली, की सुरुवातीला मी काहीशी घाबरली होती. मात्र कोरीओग्राफर आदिल व अलिशाने माझ्या मनातील भीती दूर केली. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढविला. मी दोन आठवडे नृत्याचा सराव केला. जॉननेदेखील मला खूप मदत केली. तू अजिबात घाबरू नकोस. बिनधास्त नृत्य कर...त्याने मला खूप सहकार्य केले.  विशेष म्हणजे माझे कुटुंबीय मला न सांगता गाण्याच्या चित्रीकरणासाठी सेटवर आले होते.  

वाचा ः ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

भूषण कुमार यांनी सांगितले, की मी जेव्हा पहिल्यांदा गल्ली गोरिया हे ऐकले  तेव्हाच मला विश्वास होता की प्रेक्षक या गाण्याला खूप प्रतिसाद देतील. संगीतकार ताजने हे गाणे कमालीच्या पद्धतीने तयार केले. जॉन आणि मृणालने या गाण्याला जिवंत केले. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बघून आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो. हे गाणे 11 जून रोजी टी सिरीजच्या यु ट्यूबवर प्रसारित केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: john abraham and mrunal thakur new song will release on youtube