esakal | जॅानचा 'Attack' येणार प्रेक्षकांच्या भेटीस
sakal

बोलून बातमी शोधा

attack

जॅान अब्राहमने नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि राजकुलप्रीत सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

जॅानचा 'Attack' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा जॅान अब्राहमने नुकतीच एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात जॉनसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि राजकुलप्रीत सिंग हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अॅटॅक असे या चित्रपटाचे नाव आहे.

Attack चित्रपटचे लेखन आणि दिग्दर्शन लक्ष राज नंदन यांनी केले आहे. मनोरंजन आणि अॅक्शनचा धमाका या चित्रपटामध्ये असणार आहे ,असे जॉनने सोशल मीडियावर सांगितले आहे. उत्तम कथानक आणि प्रेम यांचा मेळ असणारा हा चित्रपट 'स्वातंत्र दिनाच्या दोन दिवस आधी म्हणजेच 13 ऑगस्ट 2021 ला प्रदर्शित होणार आहे' असे ट्विट जॉनने केले आहे. 

अॅटॅक हा जॉनने घोषित केलेल्या चित्रपटांमधील या वर्षीचा दुसरा चित्रपट आहे. या आधी जॉनेने 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात तो दिव्या कुमार घोसला सोबत दिसणार आहे. जॉन त्याच्या बॅनर जेए एन्टरटेन्मेंट अंतर्गत अटॅकची सह-निर्मिती करणार आहे. 2016 मध्ये 'डिशूम' चित्रपटानंतर जॅकलिन आणि जॉन एकत्र दिसणार आहेत. 

हे वाचा - 'माझं रेकॉर्ड तोडा, मग स्वत;ला ग्रेट म्हणणार नाही'

जॉन त्याच्या बॅनर जेए एन्टरटेन्मेंट अंतर्गत अटॅक चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट ऑगस्ट 2020 मध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणीवर पडले.