esakal | 'माझं रेकॉर्ड तोडा, मग स्वत;ला ग्रेट म्हणणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut once again talked about her films achievements break my record  will stop calling myself India top actress

सोशल मीडियावर कंगणानं लिहिलं आहे की, एकतर ज्या एजेसीनं ती यादी प्रसिध्द केली होती ती खोटी आहे.

'माझं रेकॉर्ड तोडा, मग स्वत;ला ग्रेट म्हणणार नाही'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री कंगणाचा एक दिवस वादाशिवाय जात नाही. ती दरदिवशी काही ना काही सोशल मीडियावर व्टिट करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. त्यामुळे ती अनेकांचा राग ओढावून तर घेतेच याशिवाय नव्या वादाला तोंडही फोडत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलन, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन, चीनचे पंतप्रधान, इतकेच नाही तर व्टिटरचे सीईओ यांनाही धाकात ठेवण्याचे काम कंगणानं केलं आहे. स्वताची तुलना हॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी तिनं केली होती. आताही तिनं एक नवीन विधान करुन ती ट्रोल होत आहे.

ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी तुलना करुन कंगणानं स्वताचं हसं करुन घेतलं होतं. स्वताची तुलना किती करावी यावरुन तिच्यावर अनेकांनी टीका केली होती. आताही ती अशाच प्रकारच्या एका व्टिटमुळे ती पुन्हा वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींची एक यादी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली होती. त्यात दीपिका पादुकोण, करिना कपूर, अलिया भट्ट, प्रियंका चोप्रा यांच्या नावाचा समावेश होता. एका एजेंसीनं ही यादी प्रसिध्द केली होती. त्या यादीत आपलं नाव नाही असे म्हटल्यावर रागाला गेलेल्या कंगणानं नाराजी व्यक्त केली होती.

सोशल मीडियावर कंगणानं लिहिलं आहे की, एकतर ज्या एजेसीनं ती यादी प्रसिध्द केली होती ती खोटी आहे. त्यात काही निवडकच लोकं वोट करुन आपल्याला हव्या असणा-या अभिनेत्रीचे नाव पुढे करतात. लोकांना वाटते की तिच अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय आहे. मात्र तुम्ही जे सांगता त्या टॉपच्या अभिनेत्रींना पाहण्यासाठी लोक तेव्हाच जातात जेव्हा त्यात लोकप्रिय एखादा कलाकार असतो. अजब आहे ना हे, त्यात नेमका प्रकार काय आहे हे पाहायला हवं.

'मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही' 

याला म्हणतात खरा चाहता; सोनू सूदसाठी चालवली 2000 किमी सायकल

एका दुस-या व्टिटमध्ये कंगणानं लिहिलं आहे की, जर कोणी माझे रेकॉर्ड माझ्याशिवाय कोणी तोडले तर मी मला स्वताला भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणणं बंद करेल. तोपर्यत मी कुठल्याही माफियांवर विश्वास ठेवणार नाही. जे खोटा सर्वे करुन लोकांना वेड्यात काढण्याचे काम करतात. मला ठोस पुरावा दाखवा मग त्यावर विश्वास ठेवेल. अन्यथा माझ्याशी सहमत व्हा. असे कंगणानं खडसावून सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगणानं स्वताची तुलना ऑस्कर विजेती अभिनेत्री मेरिल स्ट्रीपशी केली होती. तसेच या पृथ्वीवरील आपण सर्वात प्रभावशाली अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती.