कोरोना योद्धांसाठी जॉन अब्राहमने सादर केलेली ही कविता एकदा पहाच...

john
john

मुंबई, कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात निर्माण झालेली परिस्थिती भयावह आहे. प्रत्येक गजबजलेलं शहर जणू शांत निजलं आहे. बऱ्याच उद्योगधंद्यांना काही काळासाठी टाळं लागलं आहे. गरजू, तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांना पुढील दिवस काढायचे कसे हा प्रश्न सतत सतावत आहे. कोरोना विरोधातील लढाई आपण सगळे मिळून जिंकूच असे म्हणत हजारो मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. पोलिस, नर्स, वैद्यकीय कर्मचारी जनतेच्या सुरक्षिततेसाठी रात्रं-दिवस झटत आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आभार आज प्रत्येकजण मानत आहे. कलाक्षेत्रातील काही मंडळींनी तर खास कविता, व्हिडिओ तयार करत या कर्मचाऱ्यांची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच अभिनेता जॉन अब्राहमच्या कवितेचा व्हिडिओ खरंच हृदयाला भिडणारा आहे. 

'मेरा भारत महान है' म्हणत त्याने ही कविता त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन  शेअर केली आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ही कविता लिहिली असून एका व्हिडिओमध्ये जॉन ही कविता सादर करताना दिसत आहे. या कवितेचे प्रत्येक शब्द खरंच मनाला भिडणारे आहेत. 'सडके है लावारिस, घर  पर  बैठा इन्सान है, जहॉं खेलते थे बच्चे अब खाली वो मैदान है...मंदिर और मस्जिद है बंद खुली राशन की दुकान है, हौसला है  फिर भी दिलों मैं क्यूंकी मैरा भारत महान है' अशी ही कविता आहे. या कवितेमध्ये त्याने पोलिस, आरोग्य, सफाई कर्माचारी या साऱ्यांनाच एक मानाच सलाम केला आहे. खरंच मिलाप यांची ही कविता आणि जॉनचं सादरीकरण निशब्द करणारं आहे. 

आपण एकत्र मिळून हा लढा जिंकू, नव्याने सारं काही उभं करु हे सांगणारी ही कविता आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी तर या कवितेला भरभरुन दाद दिली आहे. याआधीही बऱ्याच कलाकारांनी कविता, व्हिडिओ शेअर करत कोरोना विरोद्धची लढाई आपण साऱ्यांनी एकत्र मिळून लढायची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.  

john abraham recites a poem for the brave corona warriors  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com