esakal | शाहरुखला पाठिंबा दिल्याने जॉनी लिव्हर ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

johny lever, shah rukh khan

जॉनी लिव्हर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Aryan Khan Drugs Case: शाहरुखसाठी पोस्ट केल्याने जॉनी लिव्हर ट्रोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

काही दिवसांपूर्वी गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसोबत Aryan Khan आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन याचा जामीन अर्ज मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शाहरुखला पाठिंबा दिला आहे. अभिनेते जॉनी लिव्हर Johny Lever यांनीसुद्धा शाहरुखसोबतचा कुछ कुछ होता है या चित्रपटातील एक फोटो शेअर करत त्यांना पाठिंबा दिला. मात्र जॉनी लिव्हर यांनी आर्यनला पाठिंबा देणे चाहत्यांना फारसं आवडलं नाही. फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

जॉनी लिव्हर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. एका युजरने ‘ड्रग्ज पॉवर’ अशी कमेंटस् केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘बस करा आता, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही’ असे म्हणत जॉनी लिव्हरला ट्रोल केले आहे. पूजा भट्ट, सुझान खान, हृतिक रोशन आणि हंसल मेहता यांसारख्या इतर अनेक स्टार्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शाहरुख आणि आर्यनला पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा: आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; व्हिडीओ व्हायरल

भुलभुलैया २ या आगामी चित्रपटातून जॉनी लिव्हर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, राजपाल यादव, तब्बू यांच्या भूमिका आहेत. याशिवाय जॉनी लिव्हर हे मुंगीलाल रॉक्स आणि आप जैसा कोई नही या चित्रपटातही काम करणार आहेत.

loading image
go to top