सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरलाही झाला कोरोना

ज्युनिअर एनटीआरने ट्विट केले आहे त्यात तो म्हणतो...
NTR photo
NTR photoTeam esakal

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता दाक्षिणात्य सुपर स्टार ज्युनियर एनटीआरला कोरोना झाला आहे. त्याने ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली. सध्या तो होम क्वारंटाइन आहे.

ज्युनिअर एनटीआरने ट्विट केले आहे त्यात तो म्हणतो, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझं संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही करोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा.' या ट्विटमधून ज्युनिअर एनटीआरने त्याच्या चाहत्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे.

ज्युनिअर एनटीआरच्या या ट्विटला त्याच्या चाहत्यांनी रिप्लाय देऊन चिंता व्यक्त केली आहे.ज्युनिअर एनटीआर आधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अल्लु अर्जुन, पवन कल्याण, राम चरण या कलाकारांना करोनाची लागण झाली होती.ज्युनिअर एनटीआरच्या ट्विटला अभिनेत्री रकुल सिंग या अभिनेत्रीने ट्विट करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्युनिअर एनटीआरचा आर आर आर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत आलिया भट्ट, अजय देवगन, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस, राम चरण हे कलाकार प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी केले आहे.

NTR photo
लशीच्या दोन डोसनंतरही अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना
NTR photo
"फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही तर.. "; 'जेठालाल'ची विनंती

एनटीआरचा आरआरआर हा चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चीत चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com