देशविरोधी म्हणाल्याने जुबिन नौटियालला बसला धक्का, गायकाची आई डिप्रेशनमध्ये

देशविरोधी म्हणाल्याने जुबिन नौटियालला बसला धक्का
Jubin Nautiyal
Jubin Nautiyal esakal

Jubin Nautiyal On Arrest Twitter Trend : गायक जुबिन नौटियाल सध्या चर्चेत आहे. जुबिन विरोधात #ArrestJubinNautiyal ट्रेंडिंगला होते. त्याला अटक करण्याची मागणी झाली. गायकाला ट्रोल केले गेले. सर्व वाद त्याच्या आगामी अमेरिकेतील काॅन्सर्टबाबत होते. या कार्यक्रमाच्या आयोजकांना खलिस्तानी सदस्य आणि गुन्हेगार म्हटले गेले. हा ट्रेंड पाहून लोक जुबिनला देशविरोधी म्हणू लागले. आता या वादावर जुबिन नौटियालने (Jubin Nautiyal) मौन तोडले आहे.

Jubin Nautiyal
Brahmastra : पहिल्याच विकेण्डला 'ब्रह्मास्त्र'चं शतक, कमाई १०० कोटींपेक्षा अधिक

जुबिन नौटियाल का म्हणाला?

जुबिन नौटियालने अरेस्ट ट्रेंडवर आपले मौन सोडले आहे. तो म्हणाला ट्विटर ट्रेंड आणि वादामुळे त्याच्या आईला धक्का बसला आहे. त्या डिप्रेशनमध्ये आहे. त्याला देशविरोधी म्हटले गेले यावर त्याचा विश्वासच बसत नाही. कोणीही त्याला विचारण्याचे कष्ट घेतले नाही. अनेक वर्षापासून जे नाव कमवले. त्याला कोणी किंमत दिली नाही आणि खोट्या ट्रेंडवर भरोसा ठेवला गेला. (Entertainment News)

Jubin Nautiyal
Kangana Ranaut : 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईतील ७० टक्के आकडे खोटे, कंगनाचा दावा

तो म्हणाला, मी त्या लोकांना ओळखत नाही. आम्ही ऑगस्ट महिन्यात कार्यक्रम रद्द केला होता. करार माझे मॅनेजमेंट आणि हरजिंदर सिंग नावाच्या प्रवर्तकाच्या दरम्यान झाला होता. मला माहीत नाही हे सर्व इथपर्यंत कस पोहोचलं? माझी आई डिप्रेशनमध्ये आहे. यापेक्षा जास्त सांगायला माझ्याकडे काही नाही. पेड ट्विटर थ्रेडवर बातम्या बनवण्यात आल्या. कोणीही मला विचारण्याचे कष्ट घेतले नाही. देशविरोधी आणि मी?, या शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com