esakal | 'जुग जुग जियो'मध्ये दिसणार वरुण आणि कियाराची जबरदस्त केमिस्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

varun kiara

वरुण आणि कियाराचा 'जुग जुग जियो' मधला लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. वरुणने हा लूक सोशल मिडियावर  शेअर केला आहे.

'जुग जुग जियो'मध्ये दिसणार वरुण आणि कियाराची जबरदस्त केमिस्ट्री

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोघांची सिजलिंग केमिस्ट्री लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'जुग जुग जियो' या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात देखील झालीये. सोशल मीडियावर धर्मा प्रोडक्शनने ऑन-स्क्रीन कपलचा हा पहिला लूक शेअर केला आहे. वरुण आणि कियाराने देखील हा पहिला लूक त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हे ही वाचा: रकुलप्रीत सिंहचं 'या' अभिनेत्यासोबत काम करण्याचं स्वप्न होणार पूर्ण     

वरुण आणि कियाराचा 'जुग जुग जियो' मधला लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. वरुणने हा लूक सोशल मिडियावर  शेअर करत म्हटलंय, 'जुग जुग जियो हॅपी वाईफ, हॅपी लाईफ'. तर दुसरीकडे कियारने लिहिलंय, 'जुग जुग जियो हॅपी हसबंड, हॅपी लाईफ'.

'जुग जुग जियो' या सिनेमात वरुण आणि कियारा यांच्यासोबतंच अनिल कपूर आणि नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  या सिनेमातील अनिल कपूर आणि नीतू कपूरच्या शूटिंगला सुरुवात झालीये. याबाबत निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने १७ नोव्हेंबरलाच सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली होती. अभिनेत्री नीतू कपूर यांनी शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या सिनेमाची खासियत म्हणजे नीतू कपूर खूप वर्षानंतर पुन्हा एकदा कॅमेरा समोर आल्या आहेत. नीतू कपूर यांनी सेटवरील फोटो शेअर करत म्हटलंय, 'खूप वर्षानंतर सेटवर परतली आहे. एक नवी सुरुवात आणि सिनेमांची जादू. आई, कपूर साहेब आणि रणबीर सतत माझ्यासोबत आहे. थोडी घाबरली आहे पण मला माहित आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात.'

या सिनेमातील स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या मनात सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसंत वरुण-कियाराची हॅपी हसबंड आणि वाईफची जोडी काय धमाल करणार याकडेही सगळ्यांच लक्ष लागलंय.

jug jug jiyo varun kiaras sizzling chemistry as happy husband wife will leave you excited  

loading image