अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचं 'या' अभिनेत्यासोबत काम करण्याचं स्वप्न होणार पूर्ण

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 20 November 2020

अजय देवगण आणि बिग बी 'मेडे' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात बिग बी आणि अजय देवगणसोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंहदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

मुंबई-  बॉलीवूड महानायक  अमिताभ बच्चन आणि अजय देवगण ही जोडी अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. ‘मेजर साहब’, ‘खाकी’, ‘सत्याग्रह’ हे  त्यातलेच काही सिनेमे जे चाहत्यांच्या लक्षात असतील. आता पुन्हा एकदा अजय देवगण आणि बिग बी 'मेडे' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. जवळपास ७ वर्षानंतर मेडे या सिनेमासाठी ही जोडी एकत्र आली आहे. विशेष म्हणजे या सिनेमात बिग बी आणि अजय देवगणसोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंहदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

हे ही वाचा: शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि..    

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट आणि इन्स्टा पोस्ट करत रकुलप्रीत सिंह ‘मेडे’ या आगामी सिनेमात झळकणार असल्याचं सांगितलं आहे. या सिनेमात रकुल एका महिला वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. अजय देवगण ‘मेडे’ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून तो या सिनेमात मुख्य भूमिका देखील साकारणार आहे. त्याच्यासोबतच बिग बी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्ये या सिनेमाचं हैदराबादमध्ये शूटिंग करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.

आता रकुलने याबाबत एका मिडिया हाऊशी बोलताना सांगितलं आहे की तिने याआधी देखील अजयसोबत काम केलं आहे. मात्र अमिताभ यांच्यासोबत काम करण्यासाठी ती खूप उत्साही आहे. तीने म्हटलंय की ''या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे. '' 

काही दिवसांपूर्वी रकुलप्रीतचं नाव बॉलीवूड ड्रग केसमध्ये समोर आलं होतं. सोशल मिडियावर तिच्याविरोधात खूप ट्रोलिंग देखील झालं होतं.   

rakul preet singh will be part of film mayday which will be directed by ajay devgan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakul preet singh will be part of film mayday which will be directed by ajay devgan