esakal | एअरपोर्टवर कित्येक तास अडकली अभिनेत्री जुही चावला, व्हिडिओ शेअर करत म्हणाली ''लज्जास्पद अवस्था''
sakal

बोलून बातमी शोधा

juhi

व्हिडिओ शेअर करत जुही चावलाने भारतीय विमानतळ प्राधिकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर खराब व्यवस्थेमुळे तिने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला चांगलंच फटकारलं आहे.

एअरपोर्टवर कित्येक तास अडकली अभिनेत्री जुही चावला, व्हिडिओ शेअर करत म्हणाली ''लज्जास्पद अवस्था''

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एअरपोर्टवर असल्याचं कळतंय. हा व्हिडिओ शेअर करत जुही चावलाने भारतीय विमानतळ प्राधिकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर खराब व्यवस्थेमुळे तिने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला चांगलंच फटकारलं आहे. 

हे ही वाचा: कंगना रनौतच्या घरी दिवाळीत झालं तिच्या वहिनीचं आगमन, म्हणाली ''आमच्या घरी देवी आली''  

बुधवारी अभिनेत्री जुही चावला आयपीएल २०२० संपल्यानंतर दुबईवरुन भारतात परतत होती. यामध्ये आरोग्य मंजुरीच्या कारणास्तव एअरपोर्टवर कित्येक तास अडकली होती. या दरम्यान जुही चावलासोबतंच इतर प्रवासी देखील आरोग्य मंजुरीच्या रांगेत वाट पाहताना दिसून आले. या व्हिडिओमध्ये जुही चावला गर्दीमध्ये खोळंबलेली दिसून येतेय जिथून तिने हा व्हिडिओ बनवला आहे.

व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'विमानतळ आणि सरकारी व्यवस्थेला विनंती आहे की लवकरात लवकर एअरपोर्टवर गरजेप्रमाणे आरोग्य मंजुरीसाठी अधिका-यांना तैनात करा. इथे अनेक प्रवासी एअरपोर्टवर कित्येक तास खोळंबले आहेत. सतत एकानंतर एक, एकानंतर एक अशा फ्लाईट्स येत आहेत. काय बकवास आहे. लज्जास्पद अवस्था.''

अभिनेत्री जुही चावला आयपीएल २०२० संपल्यानंतर दुबईवरुन भारतात परतत होती. तिच्या क्रिकेट टीमला प्रोत्साहन देण्यासाठी ती दुबईमध्ये गेली होती. मात्र जशी ती स्वदेशी परतली तसा तिला एअरपोर्टवर आरोग्य मंजुरीसाठी कित्येक तासांचा खोळंबा सहन करावा लागला. तिच्यासोबत कित्येक प्रवासी खोळंबले होते. केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स नुसार, परदेशातून आलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने ७२ तासांसाठी स्वतःच्या घरी होम क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे.   

juhi chawla slams airport authorities after uae return says shameful state  

loading image