esakal | कंगना रनौतच्या घरी दिवाळीत झालं तिच्या वहिनीचं आगमन, म्हणाली ''आमच्या घरी देवी आली''
sakal

बोलून बातमी शोधा

kangna

कंगनाने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या भावाच्या लग्नातील बरचसे फोटो शेअर करत अपडेट्स दिले होते. आता तिने तिचा लहान भाऊ अक्षतची पत्ना आणि तिची वहिनी ऋतुचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे ज्याची माहिती तिने सोशल मिडियावर दिली आहे.

कंगना रनौतच्या घरी दिवाळीत झालं तिच्या वहिनीचं आगमन, म्हणाली ''आमच्या घरी देवी आली''

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-   बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा भाऊ अक्षत रनौतचं लग्न गेल्या गुरुवारी म्हणजेच १० नोव्हेंबरला राजस्थानमधील उदयपूरमध्ये मोठ्या धूमधाममध्ये झाली. कंगनाने सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या भावाच्या लग्नातील बरचसे फोटो शेअर करत अपडेट्स दिले होते. आता तिने तिचा लहान भाऊ अक्षतची पत्ना आणि तिची वहिनी ऋतुचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे ज्याची माहिती तिने सोशल मिडियावर दिली आहे. कंगनाने तिचे आणि तिच्या भावाचे आणि वहिनीचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती हातात दिव्यांनी सजलेली थाळी घेऊन उभी आहे.

हे ही वाचा: कपिल शर्माचं मुलगी अनायरासोबत पहिलं दिवाळी सेलिब्रेशन 

कंगनाने हे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी घरी येते. आज आमची वहिनी पहिल्यांदा घरी येत आहे. या परंपरेला अंदरेरा म्हणजेच गृहप्रवेश असं म्हणतात. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.'' या फोटोंमध्ये कंगना सफेद रंगाच्या सूटमध्ये दिसतेय. तिच्यासोबत तिची बहीण रंगोली, भाऊ अक्षत आणि वहिनी ऋतु देखील दिसत आहेत.

कंगनाची वहिनी लाल रंगाच्या दुल्हन सुटमध्ये खुप सुंदर दिसतेय. अक्षतच्या लग्नात कंगनाने केलेला प्रत्येक लूक चर्चेत राहिला होता. तिने भावाच्या लग्नासाठी जवळपास ७० लाख रुपये स्वतःच्या लूकवर खर्च केले होते. कंगना अक्षतच्या लग्नात कस्टम मेड बांधणी लेहेंग्यामध्ये दिसून आली. हा लेहेंगा बनण्यासाठी १४ महिने लागले. हा लेहेंगा डिझायनर अनुराधा वकिलने तयार केला आहे. या लेहेग्याची किंमत १६ लाख असल्याचं म्हटलं जातंय.   

kangana ranaut welcomes sister in law in family wishes fans happy diwali