
Kabir Bedi Birthday : पोरीच्या वयाच्या मुलीशी 'सत्तरीत' लग्न! रोमँटिक अभिनेत्रीचा 'करामती बाप'
Kabir Bedi Happy Birthday Love Story Married : बॉलीवूडमध्ये आवर्जुन अशा काही सेलिब्रेटींच्या नावाचा उल्लेख करावा लागेल जे त्यांच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांचे नाव घ्यावे लागेल. खर्जातील दमदार आवाज, भेदक डोळे, संवादकौशल्य यामुळे कबीर बेदी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
काही दिवसांपूर्वी कबीर बेदी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यावर सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. वैयक्तिक आयुष्यात मोठमोठी संकटं आली असताना कबीर बेदी हे नेहमीच आपल्या परखड स्वभावावर ठाम राहिले. त्याची त्यांना मोठी किंमतही चुकवावी लागली. अशा या अभिनेत्याचा आज बर्थ डे आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.
Also Read - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...
कबीर बेदी यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. मात्र त्यांच्या चाहत्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी वयाच्या सत्तरीमध्ये आपल्या मुलीच्या वयाच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. ते खूप चर्चेत आलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही झाली होती. मात्र ते ठाम होते. आपण काहीही चूक केली नाही. प्रेम केलं आणि ते निभावणार अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
तेव्हा कबीर बेदी यांचे वय ७० तर त्यांच्या गर्लफ्रेंडचे वय ३० होते. त्यावरुन त्यांना बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी देखील सुनावले होते. कबीर बेदी हे केवळ बॉलीवूडचे अभिनेते नाहीतर त्यांनी हॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आज जे वयाची ७७ वर्षे पूर्ण करत असून आपल्या लाडक्या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'
कबीर बेदी यांनी पहिल्यांदा १९६९ मध्ये ओडिसी नर्तिका प्रोतिमा यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं झाली. पुजा बेदी आणि सिद्धार्थ. त्यापैकी पुजा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र कबीर बेदी आणि परवीन बाबी यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा तेव्हा व्हायरल झाले होते. त्यानंतर कबीर यांच्या आय़ुष्यात सुसेन हॅम्फ्रेसची इंट्री झाली. त्यांनी लग्न केले मात्र ते फार काळ टिकलं नाही.
हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!
पुढे १९९० मध्ये बेदी यांनी रेडिओ प्रेझेंटेटर निक्की यांच्याशी तिसरं लग्न केलं. मात्र ते पंधरा वर्षांनी वेगळे झाले. यानंतर ७० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून कबीर बेदी यांनी गर्लफ्रेंड परवीन दोसांज यांच्याशी लग्न केले. ते दहा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. परवीन ही कबीर यांची मोठी मुलगी पुजा बेदीपेक्षा तीन ते वर्षांनी लहान आहे.