रात्रीत स्टार झालेल्या 'कच्चा बदाम'च्या गायकाला पोलिसांनी बोलवलं ठाण्यात

Kacha Badam Singer Bhuban Badyakar
Kacha Badam Singer Bhuban Badyakar esakal
Updated on
Summary

सध्या 'पुष्पा' चित्रपटाच्या डायलॉग्ससह सोशल मीडियावर एका गाण्यानं धुमाकूळ घातलाय.

Bengali Song Kacha Badam : सध्या 'पुष्पा' चित्रपटाच्या डायलॉग्ससह सोशल मीडियावर (Social Media) एका गाण्यानं धुमाकूळ घातलाय. हे गाणं आहे 'कच्चा बदाम'. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'कच्चा बदाम'वर नाचताना दिसतोय. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडिओ बनत आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवर स्क्रोल केल्यास, प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलमध्ये 'कच्चा बदाम' गाणं ऐकू येईल. इतकं ते व्हायरल झालंय.

खरंतर आधी 'कच्चा बदाम' हे गाणं नव्हतं. एका शेंगदाणे विक्रेत्याने शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या ओळींचा वापर केला. भुवन बडायकर असं या शेंगदाणा विक्रेत्याचं नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. भुवन बडायकर (Bhuvan Badyakar) अशी गाणी म्हणत शेंगदाणे विकायचे. आता तुम्ही विचार करत असाल की बदामाचा आणि शेंगदाण्यांचा काय संबंध? तर शेंगदाण्याला पश्चिम बंगालमध्ये 'कच्चा बदाम' म्हणतात.

Kacha Badam Singer Bhuban Badyakar
अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

गुरुवारी बंगालचे पोलिस महासंचालक मनोज मालवीय (Director General of Police Manoj Malviya) यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भुवन बडायकर याला राज्य सचिवालयामध्ये बोलावलं आणि त्याच्याकडून 'कच्चा बदाम' (Kacha Badam Singer) हे गाणं ऐकून घेत त्याचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. भुवन बडायकरनं आपल्या गाण्यानं पोलीस अधिकाऱ्यांची मनं जिंकली. भुवन हा पश्चिम बंगालमधील कुरलजुरी गावचा रहिवासी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com