'कहानी घर घर की' फेम अभिनेता समीर शर्माची आत्महत्या, टीव्ही इंडस्ट्रीला पुन्हा मोठा धक्का

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 6 August 2020

पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीला एक धक्का बसला आहे. अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केली आहे.

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आधीच मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. त्यानंतर अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने आत्महत्या केल्याने प्रेक्षकांना धक्का बसला होता आता पुन्हा एकदा टेलिव्हिजन इंडस्ट्रीला एक धक्का बसला आहे. अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केली आहे. 'क्योंकी सांस भी कभी बहु थी', 'कहानी घर घर की', 'ये रिश्ते है प्यार के' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये समीरने काम केलं आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री दिशा पटानीचे वडिल कोरोना पॉझिटीव्ह

अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह मालाड येखील त्याच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. मात्र कोणतीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही. या प्रकरणात पोलिसांना ही नक्की आत्महत्याच आहे की दुसरं काही असा संशय आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार समीर शर्मा काही दिवसांपासून कोणालाच दिसून येत नव्हते. जेव्हा त्याच्या फ्लॅटमधून दुर्गंधी यायला सुरुवात झाली तेव्हा सोसायटीच्या वॉचमनने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला. 

असं म्हटलं जातंय की जवळपास २ दिवस आधी समीर शर्माचा मृत्यु झाला होता. आणि जेव्हा शरिरातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली तेव्हा आजुबाजुच्यांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं.  

kahani ghar ghar ki fame actor sameer sharma dies by suicide in mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kahani ghar ghar ki fame actor sameer sharma dies by suicide in mumbai