इशा केसकरसाठी ऋषीची खास पोस्ट; व्यक्त केलं प्रेम | Isha Keskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Saxena girlfriend Isha Keskar

इशा केसकरसाठी ऋषीची खास पोस्ट; व्यक्त केलं प्रेम

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'काहे दिया परदेस' Kahe Diya Pardes या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता ऋषी सक्सेना Rishi Saxena हा अभिनेत्री इशा केसकरला Isha Keskar गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहेत. इशाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आणि त्यानिमित्त ऋषीने तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतच ऋषीने इशासोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. ऋषी आणि इशा ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. हे दोघं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमभावना व्यक्त करतात.

ऋषी सक्सेनाची पोस्ट-

'एक व्यक्ती म्हणून प्रत्येक वर्षानुसार तुझी प्रगती होत जाईल, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तू आणखी खंबीर आणि साहसी होशील. आयुष्यातील वाईट आणि चांगल्या परिस्थितीत माझी साथ दिलीस. तुला यश, ताकद आणि अर्थातच भरपूर प्रेम मिळो. हॅपी बर्थडे स्ट्राँग गर्ल, खूप प्रेम,' असं त्याने लिहिलं आहे.

हेही वाचा: उर्मिलाच्या बाळाचं बारसं; मुलाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा

ऋषीने 'काहे दिया परदेस' या मालिकेत शिवची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. तर इशाने 'जय मल्हार' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. इशाने ऋषीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे ऋषीने इशाचं पहिलं प्रपोजल नाकारलं होतं. जेव्हा तिने दुसऱ्यांना ऋषीसमोर प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याने होकार दिला.

loading image
go to top