Kajol: 'अचानक एवढी गोरी कशी झालीस?', काजोलच्या 'त्या' खुलाशानं ट्रोलर्सची बोलती बंद..

काजोलनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत रंगावरनं हिणवणाऱ्या अनेकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Kajol on trolls
Kajol on trollsGoogle

Kajol: काजोलची गणना बॉलीवूडमधल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. काजोल सोशल मीडियावर सुपर अॅक्टिव्ह पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत आपले स्वतःचे,कुटुंबाचे काही सुंदर फोटो शेअर करताना दिसते. तसंच,आपल्या प्रोफेशनल लाइफ संदर्भातही ती अपडेट देताना दिसते.

काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं सांगितलं होतं की, ट्रोलिंग सोशल मीडियावरची एक विचित्र गोष्ट आहे. आणि ती ट्रोलिंगला कधीच गंभीरपणे घेत नाही. आता काजोलनं आपल्या रंगाविषयी टीका-टिप्पणी करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

काजोल इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असते. तेव्हा तेव्हा नेटकऱ्यांचा एक टिपिकल विचार करणारा ग्रुप तिला ट्रोल करताना दिसतो आणि विचारतो की तिनं स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट घेतली आहे का?

Kajol on trolls
Kapil Sharma चं नवं गाणं Alone चर्चेत..कॉमेडीयननं गाण्यातून सांगितलीय आपल्या ब्रेकअपची कहाणी

याआधी कजोलनं खरंतर हे स्पष्ट केलं आहे की तिनं स्किन गोरी करणारी कोणतीच सर्जरी केलेली नाही ..तिनं उन्हात जाणं टाळल्यानं तिच्या स्कीनच्या रंगात बदल झाल्याचं ती म्हणाली होती. उन्हात जात नसल्यामुळे तिची त्वचा टॅन होत नाही.

यावेळी काजोलनं एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे,ज्यात तिनं आपला चेहरा काळ्या कपड्यानं पूर्ण झाकून घेतला आहे.त्यामुळे तिला ओळखता येणं कठीण झालं आहे,कारण तिनं डोळ्यांचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी गॉगलही लावला आहे.

असं वाटतंय की हा फोटो एका स्टोर जवळ क्लिक केला गेला आहे. कारण तिनं चेहऱ्यावर मास्क आणि चष्मा घातला आहे,त्या दोन्ही गोष्टींवर प्राइज टॅग दिसत आहे.

Kajol on trolls
Bigg Boss 16: शो च्या मेकर्सवर जय भानुशालीनं काढली खुन्नस..विनरचं नाव घेत केला शॉकिंग खुलासा
Kajol Instagram story image
Kajol Instagram story imageInstagram

या फोटोला शेअर करत काजोलनं त्या सगळ्यांसाठी रिअॅक्शन दिली,जे तिला कायम विचारत आलेयत की ती अचानक गोरी कशी दिसू लागली.

काजोलनं लिहिलं की,''त्या सगळ्यांसाठी हा फोटो जे मला मी गोरी कशी झाली हे विचारतात.#Sunblocked #spfunbeatable''

काजोलनं २०१४ मध्ये एक मुलाखत दिली होती होती ज्यात तिनं स्किन लाइटनिंगच्या तिच्या संदर्भातल्या अफवांवर स्पष्टिकरण देत अनेकांना खडे बोल सुनावले होते.

ती म्हणाली होती,''मी कोणतीच स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही. मी फक्त उन्हापासून स्वतःला लांब ठेवलं. माझ्या आयुष्यातील १० वर्ष मी खूप उन्हात काम केलं. आणि हेच कारण आहे की माझी स्किन खूप टॅन झाली आणि आता मी उन्हात काम करत नाही.

त्यामुळे आता मी टॅन होण्याचा प्रश्नच नाही. ही स्किन व्हाइटनिंग सर्जरी नाही..ही आहे घरी राहण्याची सर्जरी''.

Kajol on trolls
Rakhi Sawant च्या भावाचा आदिल खान विरोधात खळबळजनक खुलासा; म्हणाला,'आमच्या आईचं निधन झालं त्याच दिवशी..'

काजोलच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तिला आपण शेवटचं रेवतीनं दिग्दर्शित केलेल्या 'सलाम वेंकी' सिनेमात पाहिलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत विशाल जेठवा मुख्य भूमिकेत होता. या सिनेमात आमिर खानचा देखील कॅमिओ होता.

आता काजोल लवकरच 'द गूड वाइफ' सिनेमात दिसणार आहे, जी याच नावाच्या अमेरिकन सीरीजचं इंडियन व्हर्जन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com