
काजल अग्रवालचं एरोबिक, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स
बॉलीवूड-दक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. काही महिन्यांपूर्वी काजल अग्रवालने तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली होती. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून बेबी शॉवरची एक छोटीशी झलक दाखवली आहे. (Kajal Aggarwal enjoys aerobic exercise at the gym)
त्यासोबतच तिने व्यायाम करतानाचा फोटो शेअर केला आणि निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून एरोबिक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग व्यायामाचे महत्त्व देखील सांगितले. तिने लिहिले, "मी नेहमीच एक सक्रिय व्यक्ती राहिले आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य काम केले आहे. प्रेग्नेसी हा एक वेगळा बॉल गेम आहे! गरोदर असलेल्या सर्व महिलांना एरोबिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्या गरोदरपणात निरोगी जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्ट्रेंथ कंडिशनिंग व्यायाम केला पाहिजे. पिलाटे्सने गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान माझ्या शरीरात चांगले बदल करण्यास मदत केली. यामुळे मला सतत एनर्जीटीक वाटते."
Web Title: Kajal Aggarwal Enjoys Aerobic Exercise At The Gym
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..