Nyasa Devgan: न्यासाचं वयचं काय? 'ती तिचं आयुष्य जगतेय...', लेकीच्या लोकप्रियतेने काजोल खुश

Nyasa Devgan
Nyasa DevganEskal
Updated on

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची यांनी त्याच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अजूनही काजोलची क्रेझ कायम आहे.

मात्र केवळ काजोल आणि अजयचं नाही तर त्याची मुलगी न्यासा देवगण ही देखील नेहमीच चर्चेत असते. न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही खुप आहे.

अनेकदा ती पार्टी आणि इव्हेंटमध्ये स्पॉट केली जाते आणि ड्रेसमुळे चर्चेत राहते. अनेकवेळा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले जाते. तर कधी नेपोकिड म्हणुनही तिला ट्रोल केले जाते.

Nyasa Devgan
Haarsh Limbachiyaa: 'तुझी बायको तुझ्यापेक्षा जास्त कमावते', लोकांच्या टोमण्यावर भारतीच्या नवऱ्याचं कडक उत्तर...

मात्र, अजय आणि काजोल नेहमी न्यासाला ट्रोलिंगकडे विशेष लक्ष देऊ नकोस असा सल्ला देतात. तर न्यासाही टिकेकडे दुर्लक्ष करते. त्याचवेळी, आता एका कार्यक्रमात काजोलने तिची मुलगी न्यासा हिच्या लोकप्रियतेवर प्रतिक्रिया दिली आहे.

काजोल ही तिच्या मुलीला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे खुप खुश आहे. असं नुकतच तिनं असं एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

काजोल म्हणाली, 'मला तिचा अभिमान वाटतो यात काही शंका नाही. मला तिची एक गोष्ट खुप आवडते ती म्हणजे न्यासा कुठेही गेली तरी ती आत्मविश्वासाने तिथे स्वत:ला सिद्ध करते.

पुढे ती म्हणते की, मी एवढेच सांगू शकते की ती 19 वर्षांची आहे आणि तिचं आयुष्य पूर्ण खुलेपणाने जगत आहे. तिला जे करायचं आहे ते करण्याचा तिला अधिकार आहे, ती करू शकते. मी तिला नेहमीच त्यासाठी पाठिंबा देईन.

Nyasa Devgan
Parineeti Chopra: राघव चढ्ढासोबतच्या लग्नाच्या वृत्तावर परिणीती चोप्राने सोडले मौन, लाजत दिली ही प्रतिक्रिया

अजय आणि काजोलचे चाहते अनेकदा विचारतात की न्यासा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करतेय? या प्रश्नावर दोघांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे की, त्यांच्या मुलीचा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नाही.

काजोलच्या आधी अजयही आपल्या मुलीच्या स्वातंत्र्याबद्दल बोला आहे. ट्रोलिंग केल्यामुळे तिला वाईट वाटतं, पण न्यासा याचा कधीच परिणाम होऊ दिला नाही, असंही तिनं म्हटलं आहे.

Nyasa Devgan
Bheed Box Office Collection: पाचव्या दिवशीही 'भिड'ची अवस्था वाईट, चित्रपटाने केली एवढीच कमाई

मात्र सध्या न्यासा देवगन तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यासा नेहमीच लाइमलाइटचा एक भाग बनलेली असते.

त्यामुळे अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी लवकरच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण करताना दिसणार आहे असा दावा अनेकदा करण्यात येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com