Nysa Devgn: दिवाळी पार्टीत गोल्डन लेहेंग्यात गोडच दिसली न्यासा देवगण, मग नेटकरी का करु लागलेयत ट्रोल? Ajay Devgan Trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgan Daughter Nysa Devgan  Trolled, Diwali party look

Nysa Devgn: दिवाळी पार्टीत गोल्डन लेहेंग्यात गोडच दिसली न्यासा देवगण, मग नेटकरी का करु लागलेयत ट्रोल?

Nysa Devgn: अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी पार्टीत नजरेस पडली, पण त्यात तिला ओळखताच येईना असं अनेकांचे मत पडले. न्यासा देवगणला भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत स्पॉट केलं गेलं,ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या तर न्यासा तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे भलतीच चर्चेत आहे. पण या दिवाळी पार्टीतील फोटो पाहून नेटिझन्स न्यासाला जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. सर्वचजणं अंदाज लावत आहेत की तिनं चेहऱ्याची सर्जरी केली असावी. चला,सविस्तर जाणून घेऊया याविषयी. (Ajay Devgan Daughter Nysa Devgan Trolled, Diwali party look)

बॉलीवूडमध्ये सध्या मोठ्या धामधुमीत दिवाळी साजरी करताना सगळेच स्टार दिसत आहेत. स्टार्स सोबतच निर्माते देखील दिवाळी पार्टीचं आयोजन करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वीच मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं,तेव्हा अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबर,२०२२ रोजी बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये बॉलीवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते, ज्यात अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण देखील सामिल झाली होती.

भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत न्यासाला गोल्डन कलरच्या लेहेंग्यात स्पॉट केलं गेलं होतं,ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या दिवाळी पार्टीतले न्यासाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत,ज्यात न्यासा कारमध्ये बसली होती आणि आपल्या फ्रेंड्स सर्कलसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. बातमीत तो व्हिडीओ जोडलेला आहे.

हेही वाचा: Drishyam 2: उरले फक्त ४८ तास! 'या' भन्नाट ऑफरसह सिनेमाचं तिकीट आत्ताच बूक करा...

न्यासाचा भूमीच्या पार्टीतला व्हिडीओ व्हायरल झाला तसं नेटकऱ्यांनी तिल ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'ही न्यासा का? ओळखताच येत नाही हीला?' तर कुणी कमेंट केलीय की,' बोटोक्स का कमाल...', तर कुणी लिहिलंय,'सर्जरीसाठी धन्यवाद'. आणखी एकानं लिहिलं आहे की,'वर्षभरापूर्वी पर्यंत ही कशी दिसायची,हे सगळं सर्जरी,बोटोक्स आणि व्हाइटनिंग इंजेक्शनची कमाल आहे'.

काहीही असलं तरी, अजय आणि काजोलच्या कन्येनं भूमीच्या पार्टीत सगळ्यांच्याच नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या. पण न्यासानं खरंच अशी कोणती सर्जरी केलीय का किंवा ट्रीटमेंट केलीय का? याविषयी काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.