esakal | 'देवी'मध्ये झळकणार काजोल अन् मुक्ता बर्वे!
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol and Mukta Barve plays important role in Devi Shortfilm

देवी या लघुपटात काजोल आणि मराठमोळी मुक्ता बर्वे एकत्र झळकल्या आहेत. या लघुपटाचे नाव 'देवी' असून नुकताच त्याचा पहिला पोस्टर रिलीज झालाय. या लघुपटात हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रीही दिसत आहेत.

'देवी'मध्ये झळकणार काजोल अन् मुक्ता बर्वे!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मल्टीस्टारर चित्रपटांची सध्या मराठीसह बॉलिवूडमध्येही चलती आहे. पण काही दिवसांतच मल्टीस्टारर लघुपटही येतोय. विशेष म्हणजे या लघुपटात काजोल आणि मराठमोळी मुक्ता बर्वे एकत्र झळकल्या आहेत. या लघुपटाचे नाव 'देवी' असून नुकताच त्याचा पहिला पोस्टर रिलीज झालाय. या लघुपटात हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रीही दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोस्टरवरून हा लघुपट महिलांच्या विषयाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होतंय. या लघुपटात काजोल आणि मुक्तासह श्रुती हासन, नेहा धुपिया, नीना कुळकर्णी, संध्या मात्रे, रमा जोशी, शिवाजी रघुवंशी आणि यशस्विनी दायमा या आहेत. मुक्ता बुरख्यात दिसतीय तर काजोल आईच्या व गृहिणीच्या भूमिकेत दिसतीये. प्रियांका बॅनर्जीने ही लघुकथा लिहिली असून या लघुपटाचे दिग्दर्शनही प्रियांकाच करत आहे. विशेष म्हणजे या लघुपटाचे चित्रीकरण दोन दिवसांत पूर्ण झाले होते. या लघुपटाची निर्मिती इलेक्ट्रीक अॅपल्स एंटरटेन्मेंट करत आहेत. 

First Look : 'इम्तियाज' स्टाईल 'लव्ह आज कल'चं पोस्टर बघाच!

मराठी तसेच हिंदीतील सर्वोत्तम अभिनेत्री या लघुपटात दिसतायत. तसेच विषयही महिलांबाबत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. तसेच काजोल आणि मुक्ता बर्वे एकत्रितपणे लघुपटात काम करणार असल्याने त्यांच्या फॅन्समध्येही उत्सुकता आहे.