काजोलचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते म्हणाले, ‘अरे ही तर...’

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 4 December 2020

काजोलने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडीयावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय.

मुंबई- अभिनेत्री काजोल तिच्या जबरदस्त अभिनयाद्वारे गेली दोन दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आता सोशल मीडियावर देखील काजोल चांगलीच ऍक्टीव्ह असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडीयावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतोय. अनेक चाहत्यांनी तर ‘सेनोरिटा’ म्हणत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. ब्लॅक ब्युटी म्हणून ती आधीच बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. 

हे ही वाचा: व्हिडिओ: वरुण धवनने करुन दिली ‘भाभी’ची ओळख    

काजोल ९० च्या दशकात बॉलिवूडमधील एक टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. १९९२ साली तिने ‘बेखुदी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर शाहरुखसोबत तिने 'बाझीगर' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली. हा सिनेमा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतच्या सगळ्यात प्रसिद्ध सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमामुृळे काजोल रातोरात एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्यानंतर तिने ‘गुप्त’, ‘प्यार किया तो डर ना क्या’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

सध्या काजोल तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे चर्चेत आहे. तिचा ब्लॅक एँड व्हाईट फोटो सगळ्यांना पुन्हा तिच्या प्रेमात पाडण्यासाठी भाग पाडतोय. काजोल शेवटची तानाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमात दिसून आली होती. या सिनेमातील काजोलचा मराठमोळा लूक प्रेक्षकांचा प्रचंड भावला. या सिनेमात तिच्यासोबत अजय देवगण देखील होता. दोघांची रिअल लाईफमधील ही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पडद्यावर झळकली होती. आता काजोलचे चाहते तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

kajol latest black and white dress photo goes viral on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kajol latest black and white dress photo goes viral on social media