Gadar: नाहीतर काजोलच बनली असती 'गदर'ची सकीना.. 'या' कारणामुळे अभिनेत्रीनं दिला होता नकार Kajol reject gadar movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kajol, Ameesha Patel, Sunny Deol

Gadar: नाहीतर काजोलच बनली असती 'गदर'ची सकीना.. 'या' कारणामुळे अभिनेत्रीनं दिला होता नकार

Gadar: सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'गदर-एक प्रेम कथा' आज प्रेक्षकांच्या सर्वात फेव्हरेट सिनेमांपैकी एक आहे. आता लवकरच सिनेमाचा दुसरा भाग रिलीजच्या वाटेवर आहे. आता या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत.

'गदर'चा पहिला भाग रिलीज झाला होता तेव्हा तो रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात सगळ्यात अधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला होता. एका मुलाखतीत निर्माते अनिल शर्मा यांनी खुलासा केला होता की सकीना ही भूमिका सर्वात आधी काजोलला ऑफर झाली होती, पण तिनं ही भूमिका करण्यास नकार दिला होता.(Kajol rejected sunny deol film gadar for this reason producer revealed ameehsa patel was not first choice)

अनिल शर्मा म्हणाले होते की, त्यांना कोणाचं नाव घ्यायचं नाही पण बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी काही ना काही कारण सांगत 'गदर'ला नकार दिला होता. काहींना वाटलं की हा खूप जुन्या जमान्यातला सिनेमा आहे. काहींनी सनी देओलला त्यावेळी आपल्या स्टॅंडर्डचं समजलं नाही म्हणून सिनेमाला नकार कळवला.

जेव्हा अनिल शर्मांना विचारलं गेलं की 'गदर'साठी काजोलला संपर्क केला होता का? तेव्हा यावर उत्तर देताना निर्माते म्हणाले होते,''मी कोणाचं नाव घेणार नाही,कारण ते योग्य ठरणार नाही. मीडिया कोणाचंही नाव घेऊ शकते,त्यांना ते स्वातंत्र्य आहे..मला नाही. ''

''पण त्यावेळी आम्ही खूप बड्या अभिनेत्रींना संपर्क साधला होता. पण काहींना वाटलं की सनी देओल त्यांच्या स्टॅंडर्डचा हिरो नाही..काहींना वाटलं आम्ही त्यांच्या डिमांड्स आम्ही पूर्ण करू शकणार नाही. काहींना वाटलं आम्ही ट्रेन्डच्या विरोधात सिनेमा बनवत आहोत. आणि हे सगळं त्या अभिनेत्रींनी सिनेमाची स्क्रीप्ट न वाचता ठरवलं होतं''.

अनिल शर्मा पुढे म्हणाले की, ''सिनेमाची स्क्रीप्ट ऐकलेल्या अभिनेत्रींना वाटलं हा पीरियड ड्रामा आहे ,यात काम करणं आपल्या करिअरसाठी चांगलं नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालणार नाही. त्यावेळी सगळ्या अभिनेत्रींना परदेशात शूट होणाऱ्या सिनेमात काम करणं आवडायचं. त्यामुळे अनेकींनी तोंडावर नकार कळवला''.

''कदाचित तो त्यांचा दोष नव्हता. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यावेळी सिनेमाला नकार कळवला, त्या आता माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत,आणि सिनेमाला त्यावेळी नकार दिला म्हणून आता त्यांना दुःख होत आहे''.