Kiara Advani चा लाखोचा लेहेंगा अन् दागिनेही पडले फिके..हातातील कलीऱ्यावर का खिळल्या नजरा? काय आहे खास ?

कियारा अडवाणीच्या हातातील कलीरा हा कस्टमाइज करुन घेतला गेला होता. यामागे एक खास कारण होतं ज्याची चर्चा सध्या रंगली आहे.
Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding
Kiara Advani & Sidharth Malhotra WeddingInstagram

Kiara Advani- Sidharth Malhotra Wedding: बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर आपल्या लव्ह स्टोरीला रिअल लाइफमध्ये एक सुंदर नाव दिलं. बॉलीवूडच्या या क्यूट कपलनं ७ फेब्रुवारी रोजी आपले कुटुंबिय आणि काही मोजक्याच मित्रांच्या उपस्थितील राजस्थानमध्ये रॉयल अंदाजात लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर काही वेळात दोघांनी आपल्या ड्रीम वेडिंगचे फोटो शेअर केले आहेत,ज्याला पाहून चाहते खूप खूश आहेत आणि उत्साहित देखील आहेत. मिस्टर अॅन्ड मिसेस मल्होत्रा एकमेकांसोबत आनंदात दिसले अन् अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा..आशीर्वादाचा वर्षाव केला.

मनीष मल्होत्राच्या आऊटफिटमध्ये कियारा आणि सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत होते. कियारानं पन्ना आणि हिऱ्याची ज्वेलरी परिधान केली होती. पण यात लक्ष वेधून घेत होते ते कियाराच्या हातातील कलीरा आणि हीऱ्याची अंगठी. आता चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे यामध्ये असं काय खास आहे आणि याला कोणी बनवलं होतं.(Kiara Advani Kaliras glimpse of her lovestory with sidharth malhotra)

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding
Bhau Kadam घरी आला अन् घरच्या कुत्र्यानं थेट..., व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव

माहितीसाठी इथे सांगतो की,कियारा अडवाणीच्या हातातील हा कलीरा मृणालिनी चंद्रानं कस्टमाइज केला होता. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर कलीऱ्याचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. कलीऱ्यात कियारा आणि सिद्धार्थच्या प्रेम कहाणीला खूपच क्यूट अंदाजात दाखवलं गेलं आहे.

अभिनेत्रीच्या ब्रायडल कलीऱ्याचा क्लोज अप शेअर करत मृणालिनी चंद्रानं लिहिलं आहे की,''सुंदर..कियारा अडवाणीसाठी आमचा सिग्नेचर लव्हस्टोरी कलीरा खरंच मॅजिक करुन गेला आहे. चांदण्या,चंद्र,दोघांच्या नावातील अक्षरं..आणि फुलपाखराच्या झगमगाटात दोघांचं ज्याच्यावर जीवापाड प्रेम होतं असा सिद्धार्थच्या मृत श्वानाची छबी त्यात दिसत आहे. हा कलीरा म्हणजे दोघांची एकत्र येणारी मनं याचं प्रतिकच म्हणावं लागेल. कियारा तू नववधूच्या रुपात एखाद्या स्वप्नासारखी भासत आहेस. आम्हाला तुझ्यासाठी कलीरा आणि लग्नाचा चूडा बनवण्यास मिळाला याचा आनंद आहे. आमच्या सगळ्या टीमकडून तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद''.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रानं लग्नानंतर आपले लग्नाचे तीन सुंदर फोटो सुरुवातीला शेअर केले होते. त्यातील पहिल्या फोटोत दोघे एकमेकांसमोर बसले आहेत आणि दोघांनीही हात जोडत एकमेकांकडे पाहून क्यूट स्माईल दिली आहे. या फोटोत आपल्याला दोघांच्या हातातील लग्नाच्या अंगठ्यांची झलक पहायला मिळते.

कियारानं सिद्धार्थनं आपल्या हातात घातलेल्या अंगठीला फ्लॉन्ट केलं आहे. ही रिंग म्हणजे एक अनकट डायमंड आहे. जो तिच्या हातात खूपच सुंदर दिसत आहे.

सिद्धार्थ आणि कियारानं वेडिंग फोटो शेअर करताना लिहिलं आहे की,''आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे. आमच्या पुढील आयुष्याच्या प्रवासासाठी आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत''.

त्यांच्या या फोटोवर कतरिना कैफ,वरुण धवन, आलिया भट्ट,अथिया शेट्टी आणि अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com